ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई तालुक्यात सत्तेसाठी रणसंग्राम! जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणूक जाहीर, ५ फेब्रुवारी मतदान — ७ फेब्रुवारीला निकाल.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

वाई तालुक्यात सत्तेसाठी रणसंग्राम! जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणूक जाहीर, ५ फेब्रुवारी मतदान — ७ फेब्रुवारीला निकाल.

वाई :- वाई तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला असून, सत्तेसाठी थेट रणसंग्राम सुरू झाला आहे. वाईचे प्रांताधिकारी तथा निवडणूक अधिकारी योगेश खैरमोडे यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच आचारसंहिता तात्काळ लागू करण्यात आल्याची घोषणा केली.
या पत्रकार परिषदेला तहसीलदार सोनाली मेटकरी, नायब तहसीलदार वैभव पवार, गटविकास अधिकारी नारायण घोलप तसेच पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. निवडणूक शांततेत, पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केल्याचा ठाम विश्वास निवडणूक अधिकारी खैरमोडे यांनी व्यक्त केला.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, महत्वाच्या गट व गणांमध्ये पक्षीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, लोकप्रतिनिधींनी प्रत्येक गावातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. इच्छुक उमेदवारांची धावपळ वाढली असून, गावागावात चर्चा, बैठका आणि गुप्त रणनीती आखल्या जात आहेत.
निवडणूक वेळापत्रकानुसार १६ जानेवारीपासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, २१ जानेवारी ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. २२ जानेवारी रोजी अर्जांची छाननी होणार असून, २७ जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. २८ जानेवारीपासून अधिकृत प्रचाराला सुरुवात होणार आहे. ५ फेब्रुवारीला मतदान तर ७ फेब्रुवारीला वाई तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.
वाई तालुक्यातील या निवडणुकीत चार गट आणि आठ गणांमध्ये मतदान होणार आहे.
गट: बावधन, यशवंतनगर, भुईंज व ओझर्डे
गण: बावधन, शेंदूरजणे, यशवंतनगर, अभेपुरी, भुईंज, पाचवड, ओझर्डे व केंजळ दरम्यान, या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सत्तेच्या लढाईत कोणता पक्ष वरचढ ठरणार, याचे चित्र ७ फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button