पुसेसावळी:-(थोरवेवाडी)-राहुल सावंत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये फुलला चिमुकल्यांचा बाल बाजार.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

राहुल सावंत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये फुलला चिमुकल्यांचा बाल बाजार

पुसेसावळी ( थोरवेवाडी):-
पुसेसावळी (थोरवेवाडी) येथील राहुल सावंत इंग्लिश मीडियम स्कूल येथे चिमुकल्यांचा बाल बाजार भरविण्यात आला होता. त्याचे उद्घाटन शाळेचे पालक व शाळेच्या सचिव सौ. अश्विनी सावंत मॅडम यांच्या हस्ते पार पडले.
विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ व व्यवहार ज्ञान मिळण्यासाठी बाल बाजार राबविला गेला.
विद्यार्थ्यांनी ताजा भाजीपाला, तसेच घरगुती पद्धतीने तयार केलेले खाद्यपदार्थ जसे की इडली, समोसा, सॅंडविच इत्यादी पदार्थ विक्री केली. यासोबतच हस्तकला साहित्य, खेळणी व शैक्षणिक वस्तूंचेही स्टॉल लावण्यात आले होते.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आरोग्यदायी आहाराचे महत्त्व, खरेदी-विक्रीचे व्यवहारज्ञान, नफा-तोट्याचा हिशोब व स्वावलंबनाचे धडे प्रत्यक्ष अनुभवातून मिळाले. पालक, शिक्षक व स्थानिक नागरिकांनी बाल बाजाराला मोठ्या प्रमाणावर भेट देत विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. हणमंत ठोंबरे सर,सुपरवायझर सौ. कविता भोसले,सांस्कृतिक विभाग प्रमुख नम्रता तडाके,कोमल यादव,किरण कदम व सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
बाल बाजार उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून शिक्षणासोबत व्यवहारज्ञान देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.




