सातारा:-अनुष्का पाटोळे प्रकरणी सीबीआयची सकल मातंग समाजाची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

अनुष्का पाटोळे प्रकरणी सीबीआयची सकल मातंग समाजाची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी.

सातारा:- लातुर जिल्हातील अनुष्का किरण पाटोळे हिचा शाळेमध्ये संशयास्पद मृत्यु झाला असुन तिच्या मृत्युची सी. बी. आय. मार्फत चौकशी करुन संबंधित गुन्हेगाराला कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी. लातुर येथील जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावी शिक्षण घेत असलेली लहान मुलगी आत्महत्या कशी करु शकते? हा प्रश्न महाराष्ट्रातील सर्व जनतेला व मातंग समाजातील तरुर्णीना व महिलांना पडलेला आहे. त्यामुळे सदरच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. ज्या विद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे, त्या विद्यालयाचे मान्यता रद्द करण्यात यावी व विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी यांची सदर प्रकरणामध्ये कसुन चौकशी करण्यात यावी. सदरची बाब ही गंभीर असुन याच्यामध्ये अॅट्रॉसिटी किंवा अनुसुचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच या घटनेमध्ये आय. पी. एस. अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात यावी. सतत होत असलेले महिलांवर अन्याय, अत्याचार यामध्ये स्पष्ट दिसुन येत आहे. महाराष्ट्रातील महिला व मुली या असुरक्षित आहेत. त्यामुळे आम्ही सकल मातंग समाजाच्या माध्यामातुन सदर घटनेचा निषेध करीत आहोत. तसेच अनुष्का पाटोळे मृत्यु प्रकरणी सी. बी. आय. मार्फत चौकशी व्हावी. ज्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत होती. त्या संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी. तसे न झाल्यास सातारा जिल्ह्यातील सकल मातंग समाज येत्या १५ जानेवारी २६ रोजी सातारा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा सकल मातंग समाजाच्या वतीने देण्यात आला.




