सातारा:-आद्य विद्यार्थीनी कु. मुक्ता साळवे जयंती निमित्त आदर्श युवती महिला पुरस्कार प्रदान.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

आद्य विद्यार्थीनी कु.मुक्ता साळवे जयंती निमित्त आदर्श युवती महिला पुरस्कार प्रदान.

सातारा दि.8(प्रतिनिधी)-साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सामाजिक व सांस्कृतीक समिती मातंग समाज गुरुवार व मल्हार पेठ सातारा आयोजित 5 जानेवारी 2026 रोजी गुरूवार -मल्हार पेठेतील दलितमित्र मेहेबान हिराभाऊ वायदंडे चौक या ठिकाणी क्रांतिवीर लहुजी वस्ताद यांची पुतणी, ज्योतिबा व सावित्रीमाई फुले यांची देशातील पहिली आद्य विद्यार्थीनी कु.मुक्ता साळवे यांची जयंती उत्साहात साजरी केली. या सोहळ्यास प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत प्रा.शरद गायकवाड, अप्पर पोलिस अधीक्षक मा. डॉ.वैशाली कडुकर, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणा-या महिलांना पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी प्रा. शरद गायकवाड यांनी कु. मुक्ता साळवे यांच्या कार्याचा दृष्टांत दिला.
अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी स्त्री सक्षम व स्वरक्षण या विषयावर मार्गदर्शन केले. शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी स्त्री शिक्षणाचे महत्व पटवून दिले. सादिक शेख यांनी आपल्या भाषणातून सावित्री-फातिमा- मुक्ता यांच्या गुरु शिष्य नात्यावर प्रकाश टाकला.
जेष्ठ विधिज्ञ अॅड. सुचित्रा घोगरे – काटकर, नगरसेविका सावित्रीताई बडेकर, नगरसेविका अर्चना कांबळे, पत्रकार गौरी आवळे, सामाजिक कार्यकर्ते सादिक शेख, नगरसेवक संकेत संजय साठे, सचिन रविंद्र पाटोळे, मयूर कांबळे या मान्यवरांनी उपस्थिती लावली.
उदय वायदंडे शिवमुद्रा शस्त्र पथक यांनी पारंपरिक मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक दाखवत कार्यक्रमाची सुरुवात करत रिया बाबू वायदंडे हिने आपल्या वकृत्व शैलीतून मुक्ता साळवे यांचा गौरवपुर्ण इतिहास मांडला. यावेळी पुर्वा अमोल वायदंडे, रिया बाबु वायदंडे, प्रतिक्षा रोहित बोधे, शुभांगी सुनिल इंगळे, सायली राजेंद्र घाडगे, ज्योती विशाल आवाड, गौरी राकेश खरात, लत सुुंदर ओव्हाळ, अॅड. पायल संजय गाडे, रजिया अबुजर शेख, सायली संदिप कांबळे, निता दिपक धडचिरे, ऋतु योगेश धडचिरे, ऋतुु विलास धडचिरे, ज्योती अजय सावंत, सारिका युवराज खरात, निलम सिद्धार्थ खरात, शकुंतला मिलिंद पवार यांना आदर्श युवती-महिला गौरव पुरस्कार 2026 देउन सन्मानित करण्यात आले आहे.




