आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-माध्यमाने निवडक वर्गाला प्रतिनिधित्व दिले — गिरीश कुबेर

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

माध्यमाने निवडक वर्गाला प्रतिनिधित्व दिले — गिरीश कुबेर

सातारा दि: मराठी साहित्यामध्ये प्रस्थापितांना पिंगताना वाचकांनी पकडले आहे . त्यामुळे दलित वांग्मय उदयाला आले. ज्ञानपीठ पुरस्कार मोठा आहे. परंतु ,तीन भाषेमध्ये ज्यांचे ग्रंथ झाले ते सरस्वती पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ. शरण कुमार लिंबाळे यांची लहान बातमी लागते. कारण माध्यमाने निवडक वर्गाला प्रतिनिधित्व दिले. अशा शब्दात लोकसत्तेचे संपादक गिरीश कुबेर यांनी निर्भीडपणाने आपले मत मांडले. यावेळी जमलेल्या प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला .
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी ख्यातनाम लेखक आणि दैनिक लोकसत्ता संपादक गिरीश कुबेर यांची ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी आणि किशोर बेडकीहाळ यांनी मुलाखत घेतली. मुलाखतीमध्ये सडेतोडपणाने मांडणी करून खऱ्या अर्थाने नाही रे वर्गाचेच दुःख विचारपीठावर मांडल्यामुळे अनेकांनी पत्रकार कुबेर यांचे कौतुक केले.
या देशाला मध्यम मार्गाने पुढे जाता येते. आज पुरस्कार धार्जिन लोकांचे कौतुक होत आहे. तर दुसरा वर्ग लिहिता असला तरी त्याच्याकडे लक्ष दिले जात नाही. पत्रकारितेमध्ये सुद्धा एक व्यवसायाची नशा असणे आणि प्रस्थापितांना प्रश्न विचारण्याचा आनंद घेणे. हे व्यावसायिक यश आहे. पॅशन आहे. पण अलीकडच्या काळामध्ये कोणाला तरी वाईट वाटेल म्हणून तलवारी म्यान केल्या जातात. याचा दाखला देताना त्यांनी सांगितले, भाजप नेते लालकृष्ण अडवाणी एकदा म्हणाले होते की ,पत्रकारांना वाकायला सांगितले ते रांगायला लागले. आता पत्रकारितेमध्ये उत्तरदायित्व राहिलेले नाही. ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर हे आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यांनी लोकप्रिय होण्याचा मार्ग स्वीकारला नाही. तडजोडी केल्या नाहीत. विद्यापीठाच्या बाबत त्यांचे… अखेर गाढव उकडलेला गेले… किंवा हे सरकार नको श्री ची इच्छा… असं राजकीय भाष्य करणारे अग्रलेख लिहिले. असाही त्यांनी दाखला दिला.
मराठी साहित्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक पु ल देशपांडे यांच्यापुढे साहित्य गेलेले नाही. बटाट्याची चाळ गेली असली तरी आजही त्याचे वर्णन लोक लक्षात ठेवतात. शाहू पाटोळे लेखकाला कंपोशाहीमुळे उपेक्षित रहावे लागते. मराठी साहित्यामध्ये देश पातळीवरील विज्ञान, मनोरंजनामध्ये कोणीही नाही. देशपातळीवर भित्रेपणा असल्यामुळे असे घडते. असाही त्यांनी आरोप केला.
आज सत्ताधाऱ्यांकडे पुरस्कार व लाभासाठी अनेक लेखक व कलावंत हेलपाटे मारत असतात. ही वास्तवता सुद्धा त्यांनी समोर आणली. व्यवस्थेचा भाग होणे. हे जरी खरे असले तरी गुणवत्तेला मान दिला जात नाही. बुद्धिवंतांचा आदर करत नाही. असे तिने ठणकवून सांगितले.

आपण मोठे असणे हे माहीत नसणे हे दुर्दैव आहे. सध्या बौद्धिकदृष्ट्या महाराष्ट्रात वाळवंट झाले आहे.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व पश्चिम बंगाल राजाराम मोहन रॉय हे समकालीन आहेत. रॉय यांनी सतीची प्रथा बंद केली तर महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षण सुरू केले. इतर बाबतीतही त्या अर्थाने तर्कवादाचा जन्म महाराष्ट्राचाच आहे. गणपतीला रस्त्यावर आणू नका. असे सांगणारे आगरकर, प्रबोधनकार ठाकरे हे महाराष्ट्रातलेच आहेत. बाळशास्त्री जांभेकर यांनी वेधशाळाची स्थापना केली. अशी माहिती त्यांनी दिली.
दोनशे वर्षाचे काय घडले. त्याचा इतिहास व आणीबाणी हा इतिहास मांडताना त्यांनी अनेक दाखले दिले. ऊर्जा संपन्न देश आणि ऊर्जा नसलेला देश हे जरी असले तरी आता जपानमध्ये वाहना बाबत मायलेज, सी सी प्रश्न असतो . तेल निर्मितीचे साधन नसले तरी ऊर्जाबाबत तिथे विचारणा केली जाते. तेलाने अनेकदा अर्थकारण घडवले आहे. त्यामुळे काही मित्र सांगतात माझ्या शरीरात रक्त नाही तर तेल वाहते. असे त्यांनी विनोदाने स्पष्ट केले.
रशियन पंतप्रधान पुतिन ही व्यक्ती नसून ती प्रवृत्ती आहे. अशा प्रवृत्तीला पाठिंबा दिला जात आहे. सत्ता मिळवणारा नाही. तसे करावी लागते ट्रम्पनेही पुतिन याचे अनुकरण केले. सर्वांनाच आपला नेता बलदंड असावा असे बालिशपणे वाटते. नेत्यांनी हा प्रदेश गिळंकृत केला. धडा शिकवला ही मर्दानी लोकप्रिय झालेली आहे. जगामध्ये अमेरिकेच्या दरडोई उत्पन्न ८० हजार डॉलर वार्षिक आहे जर्मनीमध्ये ५९ हजार डॉलर उत्पन्न आहे. तर भारतात वार्षिक २ हजार डॉलर उत्पन्न असून सुद्धा त्याबद्दल समाधान मानले जाते. इंडोनेशियाची खाली आता भारत आहे.
मुंबई प्रकल्पाची रेलचल असून रेल्वेने लोक लटकत जात आहेत. दहा टक्के अर्थव्यवस्था ९० टक्के लोकांची अर्थव्यवस्था चालवते. देशातील बाजारपेठ आणि माध्यमांवर ही त्यांच्याच नियंत्रण आहे. असेही त्यांनी भाष्य केले.
यावेळी पत्रकार किशोर बेडकीहाळ व प्रसन्न जोशी यांनी अत्यंत मार्मिक पद्धतीने प्रश्न मांडून श्री कुबेर यांना बोलतोय केले. यावेळी प्रेक्षकांनीही उदंड प्रतिसाद दिला.
देशाच्या सध्या चाललेल्या घटनेबाबत त्यांनी सांगितले देशाची प्रगती आघाडीच्या राजकारणातच झालेले आहे. पंतप्रधान देवगौडा च्या काळात सुद्धा आर्थिक सुधारणा झाली अलीकडच्या काळामध्ये बिनविरोध निवड होणे हे लोकशाहीला घातक आहे .विरोधी पक्षाची ती मोठी जबाबदारी आहे. पण आता सत्ताधारी व विरोधक यातील फरक राहिलेला नाही. निवडणूक आयोग पूर्ण निष्क्रिय झालेला आहे आठ वर्षात निवडणुका होत नाहीत. याची आता लाज वाटायला हवी .मतांचा अधिकार काढून घेण्याची ही प्रक्रिया आहे. हे कुळ वाढले तर लोकसभेला सुद्धा बिनविरोध निवड होऊन नोटा कॉलम निरुपयोगी ठरणार आहे. यावेळी त्यांनी सरकारच्या भूमिकेबद्दल तसेच विरोधकांचे भूमिकेबद्दल सडेतोड आणि निपक्षपातीपणाने भूमिका मांडताना प्राण गेलेल्या शरीर निपक्ष असू शकतो .असा दाखला देऊन पत्रकारितेच्या माध्यमातून घडलेल्या घटनेचा ही खुलासा केला. यावेळी मोठ्या संख्येने श्रुती वर्ग उपस्थित होते.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button