मोहोडेकरवाडी:-(सुरूर वाई)-सेवा सहयोग महिला सक्षमीकरण प्रकल्प, वाई अंतर्गत महिलांसाठी कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.
पत्रकार अनिल वाडकर सातारा जिल्हा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

मोहोडेकरवाडी:-(सुरूर वाई)-सेवा सहयोग महिला सक्षमीकरण प्रकल्प, वाई अंतर्गत महिलांसाठी कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.

सेवा सहयोग महिला सक्षमीकरण प्रकल्प, वाई अंतर्गत महिलांसाठी कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हे प्रशिक्षण जीत अँग्रो फार्म येथे प्रो. (प्रा.) जीत शिवाजी बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
या प्रशिक्षणात सुरूर, वहागाव, गुळंब व कळंबे या गावांतील सुशिक्षित महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. प्रशिक्षणादरम्यान लहान पिलांपासून ते कोंबडी अंडी देईपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली. कुक्कुटपालनातील आहार, लसीकरण, देखभाल, खर्च व नफा याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प या नवीन जातीच्या कोंबडीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. ही जात वर्षाकाठी सुमारे ३०० अंडी देणारी असून शेतकरी व महिलांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणारी असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे महिलांना स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जीत अँग्रो फार्म, सोनाली कावेरी यांचे सहकार्य लाभले. हा प्रशिक्षण कार्यक्रम मोहोडेकरवाडी, सुरूर येथे संपन्न झाला. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी असा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे उपस्थितांनी मत व्यक्त केले.




