आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

विजयपूर:-हिंदू धर्मात फुट पाडाल तर मी हिमालयासारखा उभा : पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

हिंदू धर्मात फुट पाडाल तर मी हिमालयासारखा उभा : पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी.

विजयपूर : बसवादि शरण व महात्मा बसवेश्वर हिंदू दार्शनिक होते, मात्र अशा महापुरुषाला काही लोक नास्तिक ठरवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, याला विरोध करून त्याबाबत जाहीर शास्त्रार्थ करण्यास सिद्ध असल्याचे आव्हान सिद्धगिरी मठ, कणेरी, कोल्हापूरचे मठाधिपती पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी बबलेश्वर, विजयपुरा येथील जाहीर विराट बसवादि शरण हिंदू संमेलनात केले .

यावेळी विराट समुदायासमोर स्वामीजी पुढे म्हणाले, “काही लोक महात्मा बसवेश्वरांच्या वचनांचा चुकीचा पद्धतीने अर्थ लावत आहेत. बसवादि जे संत व हिंदूच होते. त्यांनी प्रत्येकाने आपल्या वचनांच्या शेवटी म्हणजेच जे अंकितनाम म्हंटले जाते त्यामध्ये त्यांनी त्यांचे त्यांचे कुलदैवत, ग्रामदैवत यांचा उल्लेख केलेला आहे. त्या सर्व देवता हिंदूंच्या आराध्य देवता आहेत, त्यावरून ते हिंदूच होते. हि दर्शित होते. असे त्यांनी स्पष्ट करून सांगितले की, काहीजण महात्मा बसवेश्वरांच्या काही वचनांचा उल्लेख करत बसवेश्वर हे मंदिर, मूर्तीपूजा, वेद, उपनिषद विरोधक होते. असे चुकीचा समज तयार करत आहेत. तर महात्मा बसवेश्वरांनी रचलेल्या अनेको वचनांमध्ये हिंदू धर्मातील देवतांची स्तुती व समर्थन केलेले आहे. तसेच त्यांच्या अनेक वचनांमध्ये त्यांच्या मताच्या पुष्ट्यर्थ वेद व उपनिषद यांतील वाक्यांचे दाखले दिलेले आहेत हे हिंदू धर्म विरोधी लोक सांगत नाहीत.
हिंदू धर्मात काही चुकीच्या गोष्ठी वेळोवेळी आल्या त्या त्या वेळी अनेक महात्मे स्वच्छ करून जातात. तसे महात्मा बसवेश्वरांनी धर्मातील अनिष्ट रूढी-परंपरा काढून टाकून शुद्धीकरणाचे काम केले म्हणून एक शुद्धबुध्द हिंदू धर्म दिला आहे .महात्मा बसवेश्वर पुनर्जन्म व कर्मसिद्धांत मानत नाहीत, अशा प्रकारे त्यांच्याबद्दल दुष्प्रचार केला जात आहे. पण बसवेश्वरांच्या अनेक वचनांमध्ये पुनर्जन्म व पूर्वजन्म सिद्धांत हि मांडलेला आहे तसेच कर्मसिद्धांत व मोक्षसिद्धांत नमूद केला आहे. त्यांनी वेदांचा स्वीकार केलेला आहे. मात्र काही हिंदू धर्म विरोधी घटक महात्मा बसवेश्वरांच्या वचनांचा चुकीचा अर्थ काढून समाजाची दिशाभूल करून गोंधळ निर्माण करत आहेत. असाही त्यांनी आरोप केला.
वीरशैव व लिंगायत असा भेद करून हि काही लोक लिंगायत समाजात हि फुट पडण्याचा प्रयत्न करत आहेत. अगोदर हिंदू आहोत मग आम्ही वीरशैव, लिंगायत आहोत असे स्वामीजींनी ठणकावून सांगितले.
यावेळी कर्नाटकातील बसव परंपरेचे अनेक संत, महात्मे, मठाधिपती मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हजारो महिला-पुरुषांच्या उपस्थितीत मोठी मिरवणूक काढून स्वामींचे स्वागत झाले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button