वाई:-ऐतिहासिक वाई शहरात वाहतूक कोंडीचा बोजावार. प्रशासनाचे दुर्लक्ष पर्यटक तसेच स्थानिक हैराण.
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

वाई:-ऐतिहासिक वाई शहरात वाहतूक कोंडीचा बोजावार. प्रशासनाचे दुर्लक्ष पर्यटक तसेच स्थानिक हैराण.

सातारा वाई.
ऐतिहासिक आणि पर्यटनाचे केंद्र असलेल्या वाई शहरात मागील काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात गंभीर होत आहे अरूंद रस्ते वाढती वाहन संख्या पर्यटकांच्या वाहनांची वाढती गर्दी तसेच मोठ्या प्रमाणात मुख्य बाजारपेठेत ओव्हर लोड वाहनांची होणारी गर्दी वाहतूकीचे नियम न पाळता मनमानी कारभार यामुळे वाई शहराच्या मुख्य बाजारपेठेत तसेच वर्दळीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे या वाहतूक कोंडीमुळे अनेक वेळा रस्ता ओलांडताना ही मोठी कसरत करावी लागत आहे. ऐका चौकातुन दुसऱ्या चौकामध्ये जाणे खूप मोठ्या कसरती होत सर्व सामान्य नागरिक, वयोवृद्ध नागरिक यांची तर मोठी दमछाक होताना पहावयास मिळते शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी वाई शहरात येणारे पर्यटक यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
वाई शहरात वारंवार एस.टी. स्टॅण्ड, शिवाजी चौक, पोस्ट ऑफिस ते द्रविड हायस्कूल परिसर ,गणपती घाट परिसर,घोटवडेकर हाॅस्पीटल परिसर, गंगापूरी शाहिर चौक, संपूर्ण भाजी मंडई परिसर, किसनवीर संपूर्ण चौक परिसर, पी.आर.चौक ब्राह्मण शाही चौक परिसर, विष्णू मंदिर परिसर ते जैन मंदिर दातार हाॅस्पीटल परिसर मोठ्या प्रमाणात अवजड ओव्हर लोड बाराचाकी वाहनांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
वाई शहरात वाहन पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे नो एन्ट्री, वनवे, नो पार्किंग नुसते नावाचे फलक नावालाच आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात टू व्हीलर पार्किंग राजरोसपणे असते.
वाहतूक पोलीस प्रशासनाचा धाक कुठेही बेशिस्त पार्किंगवर दिसत नाही मनुष्यबळ कमी आहे असे सांगून जबाबदारी झटकण्याचे काम होताना दिसत आहे पुरेश्या मनुष्य बाळासाठी वरिष्ठ विभागाकडे सातत्याने पाठ पुरावा करणे गरजेचे आहे. नागरिकांना शिस्त लावण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्याचे जास्त गरजेचे आहे वाहतूकच्या नियमांवर तसेच पार्किंगच्या नियमांवर ठोस पणे अंमलबजावणी करणे खूप गरजेचे आहे.वाई नगरपरिषदेने नागरिकांच्या सोयीसाठी पार्किंगची सोय करणे गरजेचे आहे बाजार पेठेत व्यापारी वर्ग यांच्याकडून दुकानाच्या बाहेर रस्त्यांवर मांडण्यात येणारे साहित्य भाजी मंडईत भाजीवाले यांच्या कडून अस्तव्यस्त बसण्याची पद्धत या सर्व बाबींचा वाई नगरपरिषदेने विचार करून शिस्तबद्ध करणे फार गरजेचे आहे गटरांवर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात झालेली जाहिरात बोर्ड लोखंडी जाळ्या यांचे अतिक्रमण हटविण्याचे कामही होणे गरजेचे आहे अंधाधुंद होणारी विनापरवाना मनमानी पद्धतीची होणारी अनाधिकृत बांधकामे यावर वाई नगरपरिषद वाई प्रशासनाकडून ठोस कारवाया होणे गरजेचे आहे. मात्र तसे कुठेही दिसत नाही.
वाई शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असताना देखील संबंधित प्रशासन एवढे हतबल का? का कठोर कारवाई करत नाही याचे कारण काय? या बाबत सर्व सामान्य वाईकर जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे संबंधित प्रशासनाच्या कामकाजाबाबत मिलीभगत असल्याच्याअनेक प्रकारच्या कुजबुजा मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून ऐकायला मिळत आहेत येणाऱ्या काळात वाईतील वाहतूक कोंडी सुटणार की नाही याबाबत ही मोठ्या प्रमाणात शंका व्यक्त करण्यात येत आहे.




