आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-श्री.सुनील नामदेव फणसे सरपंच ग्रामपंचायत दसवडी यांची महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद मुंबई यांनी वाई तालुका सरपंच संघटनेच्या उपाध्यक्षपदी केली निवड.

पत्रकार अनिल वाडकर सातारा जिल्हा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

वाई:-श्री.सुनील नामदेव फणसे सरपंच ग्रामपंचायत दसवडी यांची महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद मुंबई यांनी वाई तालुका सरपंच संघटनेच्या उपाध्यक्षपदी केली निवड.

श्री.सुनील नामदेव फणसे सरपंच ग्रामपंचायत दसवडी यांची महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद मुंबई यांनी वाई तालुका सरपंच संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. आज वाई येथे पंचायत समिती सभागृहात सन्मानपूर्वक देण्यात आली. सुनील(भाऊ)फणसे यांचे आणि उपसरपंच व सदस्य यांचे मनःपूर्वक अभिनंदन. ग्रामपंचायत दसवडी सुनील भाऊ सरपंच म्हणून अडीच वर्ष काम करण्याची त्यांना संधी लाभली.त्या संधीचे त्यांनी सोने करून दाखवले.त्यांची वाई तालुका संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती म्हणजे त्यांनी केलेल्या विकास कामाची पोचपावती म्हणावी लागेल.त्यांना मोलाची साथ देणारे उपसरपंच,सदस्य यांचे श्रेय मानावे लागेल. त्यांनी केलेल्या शासकीय योजनेचा पाठपुरावा व पूर्तता महत्त्वाची ठरली.ग्राम स्वच्छता अभियान मोहीम त्यांनी अत्यंत यशस्वीपणे राबवली.पिण्याच्या पाण्याची नवीन नळ पाणीपुरवठा योजना यशस्वीपणे राबवली.त्याला जोड म्हणून डोंगरातून ग्रॅव्हिटीद्वारे पाणीपुरवठा सुद्धा यशस्वीपणे केली आहे.त्याचा फायदा चार-पाच महिने लाईट बिलाची बचत होणार आहे. अनेक शासनाची केलेली कामे आचारसंहिता नंतर दिमाखात उद्घाटन सोहळा होणारच आहेत.गावातील रस्त्याचे संपूर्ण सिमेंट काँक्रीटकरण याचे काम परीपूर्ण झाले आहे.अत्यंत दर्जेदार रस्ता मजबूत बनवलेला आहे.गेल्याच वर्षी ग्रामदैवत श्री चौवनेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा दिमाखात पार पडला.लवकरच त्याची वर्षपूर्ती मार्च 2026 ला होईल.रस्त्यावरील ग्रामकमान,चौवनेश्वर मंदिरासमोरील कमान संपूर्ण जिल्ह्यात आदर्श स्थापत्य कलेचा नमुना मानला जात आहे.दोन्ही कमानी गावच्या स्वखर्चाने निर्माण केल्या आहेत. कमानी ह्या गावचे वैभवच ठरलेल्या आहेत.सुनील भाऊंना मिळालेला पुण्यनगरीचा’आदर्श सरपंच पुरस्कार’हा एक मोलाचा पैलू त्यांच्या कारकिर्दी मध्ये झालेला आहे. गावामध्ये त्यांनी सतत आरोग्य शिबिरे घडवून आरोग्य सेवा केली आहे.घरकुल योजनेची प्रत्येक वर्षी राबवली आहे.प्रत्येक वर्षी घरपट्टी वसुली 100% पूर्ण केली वेळेत जाते.महिला बचत गट यशस्वी राबवून सरकारचे अनुदान मिळवले आहे. सर्व सामान्य गावातील रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा मिळवून देणे.आयुष्यमान कार्ड मिळवून देणे.अनेकांची रेशन कार्ड काढून दिली आहेत.मोफत कामे ग्रामस्थांची हक्काची व्यक्ती करून देणारे म्हणजे सुनील भाऊ.त्याचबरोबर तहसीलदार कार्यालय,पंचायत समिती कृषी कार्यालयातील कामे करून देणारी व्यक्ती म्हणजे सुनील भाऊ. गावातील पाण्याचे शोष खड्डे ही काळजीपूर्वक कामे केली आहेत. अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील समस्या सोडवणे, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणे व शालेय साहित्य वाटप करणे. तसेच विद्युत MSEDCL गावातील अंतर्गत लाईटची अंतर्गत कामे करून घेतली आहेत. ग्रामपंचायत सदस्यांचे,सरपंच यांचे करावे तेवढे कौतुक कमीच पडत आहे.भविष्यात अशीच अनेक शासकीय कामांची पूर्तता होऊन एक आदर्श ग्रामपंचायत निर्माण होईल,हीच चौवनेश्वर चरणी विनम्र प्रार्थना असेही प्रतिपादन करण्यात आले.

श्री सुनील(भाऊ)फणसे यांचे सर्वांकडून मनस्वी
ग्रामस्थ मंडळ दसवडी यांच्यातर्फे करण्यात आले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button