पारनेर:-निर्भीड पत्रकार पुरस्कार’ शशिकांत भालेकर यांना जाहीर.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

निर्भीड पत्रकार पुरस्कार’ शशिकांत भालेकर यांना जाहीर.

स्व.बळवंतराव वाघमारे स्मृती उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार पारनेर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष विजय डोळ यांना जाहीर.
पारनेर येथे होणाऱ्या युवा साहित्य संमेलनात होणार वितरण.
पारनेर (राजकुमार इकडे) पारनेर तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित ‘निर्भीड पत्रकार पुरस्कार’ दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी शशिकांत भालेकर यांना जाहीर झाला आहे. तसेच स्व. बळवंतराव वाघमारे स्मृती उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार पारनेर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष विजय डोळ यांना जाहीर झाला. पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय शेरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुरस्कार जाहीर करण्यात आले.
हा पुरस्कार 6 जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनात भालेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे आहे.
शशिकांत भालेकर यांनी तालुक्यातील सामाजिक व राजकीय विषयांवर अभ्यासपूर्ण व निर्भीड लेखण केले आहे. राजकीय विषयांवर सखोल विश्लेषण, सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणे, अवैध व्यवसाय, सामाजिक वनीकरणातील घोटाळे, वाळू माफिया, पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीतील अनियमितता आदी गंभीर मुद्द्यांवर त्यांनी ठाम भूमिका घेत विपुल लेखण केले आहे.
तळागाळातील सर्वसामान्यांच्या समस्या व प्रश्नांवर भालेकर गेले अनेक वर्ष सातत्याने पत्रकारितेच्या माध्यमातून प्रकाश टाकतात. त्यांच्या निर्भीड वृत्तीमुळे तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यात मदत झाली आहे. विविध प्रकरणांमध्ये त्यांनी घेतलेली ठाम भूमिका त्यांना हा पुरस्कार मिळवून देणारी ठरली.
पारनेर तालुका पत्रकार संघाच्या या निर्णयाचे तालुक्यातील पत्रकार बांधवांसह सामाजिक राजकीय स्तरातून स्वागत होत आहे.
स्व. बळवंतराव वाघमारे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात, १९३३ साली तत्कालीन ज्येष्ठ विधीज्ञ कै. गंधे, कै. डॉ. गंगाधर गुळवे, कै. राम नाईक या सहकाऱ्यांसह पारनेर सार्वजनिक वाचनालयाची स्थापना केली. तब्बल ९० वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर झाले आहे. पारनेर सार्वजनिक वाचनालयाचे विद्यमान अध्यक्ष विजय डोळ यांनी वाचनालयाचे आधुनिकीकरण केले असून वाचकांना सर्वोत्तम सुविधा देण्यावर वाचनालय प्रशासनाचा भर असतो, यासाठी डोळ यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.




