कोरेगाव:-सातारा जिल्ह्यात सत्तेला बसणार धक्का : वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेचा गावोगावी एल्गार.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

सातारा जिल्ह्यात सत्तेला बसणार धक्का : वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेचा गावोगावी एल्गार.

ता. कोरेगाव गाव सोनके येथे नविन शाखा उद्घाटन प्रसंगी सातारा जिल्ह्यात वर्षानुवर्षे सत्तेचा मक्ता उपभोगणाऱ्या राजकीय टोळ्यांना आता वंचित बहुजन आघाडीने व भारतीय बौद्ध महासभेचे थेट आव्हान दिले आहे. जिल्हा पश्चिमचे जेष्ठ नेते चंद्रकांत आप्पा खंडाई, जिल्हा पूर्वचे नवनिर्वाचित अध्यक्ष रामदास भाई कांबळे आणि उपाध्यक्ष सुभाष गायकवाड जिल्हा युवा अध्यक्ष अमोल गंगावणे यांनी गावोगावी वंचित बहुजन आघाडीच्या शाखा उभारण्याचा उघडपणे विडा उचलल्याने सातारा जिल्ह्यातील प्रस्थापित सत्तावर्तुळे अस्वस्थ झाली आहेत.
आजवर साताऱ्याचे जिल्ह्यातील राजकारण हे मोजक्या घराण्यांपुरते, सत्तेपुरते आणि स्वार्थापुरते मर्यादित राहिले. बहुजन समाज, शिक्षक, कर्मचारी, शेतकरी यांच्या प्रश्नांचा वापर फक्त निवडणुकीपुरताच करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र प्रश्न जसेच्या तसेच ठेवून सत्तेचा उपभोग घेतला गेला. याच व्यवस्थेला वंचित बहुजन आघाडीने थेट धक्का दिला आहे.
गावपातळीवर शाखा उभारणी म्हणजे केवळ पक्ष वाढवणे नाही, तर साताराजिल्ह्यातील वर्षानुवर्षे रुजलेल्या दडपशाही, मक्तेदारी आणि सोयीस्कर मौनाच्या राजकारणाला थेट आव्हान देणे आहे. त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीची वाढती ताकद काहींना अस्वस्थ करत आहे.
चंद्रकांत आप्पा खंडाई यांचा अनुभव, रामदास भाई कांबळे यांची आक्रमक भूमिका आणि सुभाष गायकवाड यांची संघटनात्मक रणनीती — या नेतृत्वामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. आज जे लोक वंचित बहुजन आघाडीला दुर्लक्ष करत होते, तेच आता हालचाल करू लागले आहेत, हीच या चळवळीची पावती आहे.
साताऱ्यात आता प्रश्न स्पष्ट आहे —
सत्तेची मक्तेदारी टिकवायची की बहुजनांचा आवाज ऐकायचा?
वंचित बहुजन आघाडीने हा संघर्ष थेट रस्त्यावर आणला असून, येणाऱ्या काळात सातारा जिल्ह्यात मोठा राजकीय धक्का बसणार, हे चित्र स्पष्ट होत आहे.
आर पी एस स्टार न्युज पत्रकार तालुका महाबळेश्वर अध्यक्ष-उत्तम भालेराव.




