नागपूर हिवाळी अधिवेशन : लोकांच्या प्रश्नांपेक्षा खर्चच जड? 90+ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह.
पत्रकार प्रमोद काळे हवेली तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

नागपूर हिवाळी अधिवेशन : लोकांच्या प्रश्नांपेक्षा खर्चच जड? 90+ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह.

नागपूर:-महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे पार पडले. मात्र, या अधिवेशनाचा कालावधी अवघा काही दिवसांचा असताना, सुमारे 90 कोटी रुपयांहून अधिक खर्च झाल्याची माहिती समोर आली असून, या खर्चावर आता विविध स्तरातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
अधिवेशनाच्या कालावधीत मंत्री, आमदार, वरिष्ठ अधिकारी यांचे प्रवास व निवास, सुरक्षा व्यवस्था, प्रशासनिक तयारी, तांत्रिक सुविधा तसेच अन्य अनुषंगिक बाबींवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला. अल्पकालीन अधिवेशनासाठी एवढ्या मोठ्या निधीचा वापर कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
विरोधकांकडून अधिवेशनाच्या खर्चावर टीका होत असून, विदर्भातील प्रलंबित प्रश्न, शेतकरी समस्या, महागाई आणि बेरोजगारीसारख्या मुद्द्यांवर अपेक्षित सखोल चर्चा न झाल्याचा आरोप केला जात आहे. लोकांच्या प्रश्नांपेक्षा खर्चालाच अधिक प्राधान्य दिले गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे.




