वाई:-कायद्याचा अवमान की भिती?वाई तहसीलमध्ये माहिती अधिकाराचा अर्ज थेट घेण्यास नकार?
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

कायद्याचा अवमान की भिती?वाई तहसीलमध्ये माहिती अधिकाराचा अर्ज थेट घेण्यास नकार?

सातारा वाई.
शासकीय कामात पारदर्शकता यावी तसेच सर्व सामान्य जनतेला हक्काची माहिती मिळावी यासाठी देशाच्या सर्वोच्च सभागृहात माहितीचा अधिकार २००५ हा कायदा मंजूर करण्यात आला मात्र वाई तहसील कार्यालयात या कायद्याचा अवमान होत असल्याची माहिती समोर येत आहे याचे नक्की कारण काय?
याची शंका अनेकांना सतावत आहे शासनाच्या कोणत्याही कार्यालयात तुम्ही आपला अर्ज , निवेदन, किंवा माहिती अधिकाराचा अर्ज निसंकोचपणे देऊ शकता व त्याची रितसर पोहच पावती देणे ही कायद्याने बंधनकारक आहे. मात्र वाई तहसीलदारांचे अजब फर्मान आवक जावक विभागाला देण्यात आले आहे माहिती अधिकाराचा अर्ज आला की तो आधी आम्हाला आणून दाखवा नंतरच पोहच द्या तसेच काम आवक जावक विभागातून केले जात आहे. असे फर्मान तहसीलदारांनी काढण्याचे कारण काय त्यांना तो अधिकार आहे का? त्यांना तो अधिकार कोणी दिला? यातून वाई तहसीलदार यांचे काम पारदर्शक आहे का नाही जरी एखाद्या अर्ज घेतला तरी त्याची माहिती योग्य कालावधीत दिली जात नाही जनमाहिती अधिकारी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत नंतर अर्ज प्रथम अपिलीय अधिकारी यांचेकडे गेल्यावर त्याचे काय झाले हे पहायला ही अनेक फेऱ्या माराव्या लागतात याचे काय कारण असावे याबाबत शंकाच निर्माण होत आहे संपूर्ण वाई तालुक्याचा कारभार हा तहसीलदारांनी पहावयाचा असतो जर याच ठिकाणी जनतेचे अधिकार पायदळी तुडवण्याचे काम केले जात असेल तर सर्व सामान्य जनतेच्या अर्जांवर होणाऱ्या कामकाजाबाबत किती पारदर्शकता असेल हे सांगणे ही जरा अवघडच आहे.




