फलटण:-गौरी आगमनाची घराघरात तयारी,महिलांची लगबग भारी.!
पत्रकार प्रमोद देवाडिगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
गौरी आगमनाची घराघरात तयारी,महिलांची लगबग भारी.!
फलटण:- फलटण तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील गणपती बाप्पा आगमनानंतर आता घराघरात गौरी आगमनाची चाहूल लागली आहे.महिला गौरी आगमनाची तयारी करण्यासाठी घरोघर स्वच्छता साफसफाई डेकोरेशन सजावट करण्यासाठी लगबग सुरु झाली आहे.फलटण शहर व ग्रामीण भागातील अनेक गावांतून गौरी गणपती सणाच्या निमित्ताने अखंड दिवा विद्युत रोषणाई करण्यात येते.
येण सणासुदीला नेहमी प्रमाणे विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.त्यामुळे गौरी गणपती सणाच्या दिवसांत गणपती बाप्पा अंधारात असल्याने भाविकांच्यात प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.विद्युत वितरण कंपनीच्या वेळापत्रकानुसार तरी वीजपुरवठा सुरळीत चालू असणे अपेक्षित असताना अचानक घरगुती विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने जनतेच्या मनात तीव्र रोषाची भावना आहे.
गौरी आगमनाची तयारी फलटण शहर व ग्रामीण भागात अंतिम टप्प्यात आली आहे.गौरी सजावट करण्यासाठी फलटण शहर व ग्रामीण भागात दरवर्षी परंपरेप्रमाणे श्रध्देने महिला घराघरात तयारी करण्यात व्यस्त आहेत.