छत्रपती संभाजीनगर:-वैजापूर बस स्थानक येथे करोडो रुपये वाया घालवणारे तंत्र 2 महिन्यात बस स्थानकाची विल्हेवाट.
पत्रकार प्रदीप चव्हाण मराठवाडा विभाग सचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
छत्रपती संभाजीनगर:-वैजापूर बस स्थानक येथे करोडो रुपये वाया घालवणारे तंत्र 2 महिन्यात बस स्थानकाची विल्हेवाट.
वैजापूर बस स्थानक येथे करोडो रुपये वाया घालवणारे तंत्र 2 महिन्यात बस स्थानकाची विल्हेवाट लागली वैजापूर बसस्थानकाचे हे करोडो रुपये खर्च करून काम अंदाजे 2 महिने पूर्ण केले गेले होते आता ते अश्या प्रकारे फुपाटा होऊन लगेच सर्व बांधकाम उखडण्याची वेळ शासनावर आली हे काम आता ठेकेदार आपल्या खिशातून कसा करणार असा प्रश्न कोणी विचारू नका ?
यात वापरलेले दगड /मुरूम/ सिमेंट /वाळू/ पाणी असे विविध खनिज (निसर्ग फुकट निर्माण करून देत असतो त्याची झीज शासनाकडून धरली जात नसते व तशी तरतूद नाही )त्याची वसुली अधिनियम कायदा अस्तित्वात आला पाहिजे,यात ठेकेदारी..कामगार पगार कामगाराचे कष्ट… %.. टक्केवारी नादात सर्व काही काम कसे पूर्ण होते हा त्याचा नमुना ठेकेदार कोणतेही शासन टेंडर काढताना सबंधित कार्यकारी अभियंता यांच्या कडे शासन डिझाईन प्लॅन काढून त्यावर कागदोपत्री खर्च लिहितो. त्यात खडी, वाळू, सिमेंट अमुक तमुक आकडेवारी टाकून हुशार इंजिनियर कडून तो अहवाल तयार होतो शासनाकडून तो मंजूर होतो, ते सर्व पुस्तकी ज्ञान वापरता वापरता प्रत्यक्ष निकृष्ट दर्जाचे काम पूर्ण होत असत.. अस निकृष्ट काम केल्याने आता ते तोडण्याची वेळ आली आहे आधीच उत्तम प्रामाणिक काम केलं असत तर ही वेळ आली नसती वैजापूर बस स्थानकात मधे नवे कपडे घालून बस ची वाट पाहणाऱ्या आपल्या पाहुण्यांना धूळ मुक्त बस स्थानक नाही तर धूळ युक्त सेवा मिळावी या करता निकृष्ट कामाची पद्धत वापरली जात असते असाच काहीसा असा रेकॉर्ड कायम राहिला आहे शासन कोणतेही काम जेव्हा सुरू असत तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केवळ डोळे बंद करून मोबाईल मधे गेम खेळत कानात बोळे लाऊन भजन गाणे वाजवत, कागद पत्राचे रेकॉर्ड तयार करत असतात की काय असा प्रश्न पडतो.
कर्तव्यात कुसुर करणाऱ्या शासनाच्या मोठ्या निधीतून अश्या निकृष्ट कामाला कोणता पुरस्कार जाहीर करण्यात आला पाहिजे नागरिकांनी डोळे बंद करून सांगा बर?