पारनेर:-आम्ही दिलेले शब्द पुर्णच करतो – सुजय विखे पाटील.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
आम्ही दिलेले शब्द पुर्णच करतो . सुजय विखे पाटील.
रुपेश ढवण यांचे ९व्या दिवशी आमरण उपोषण मागे.
पारनेर – आम्ही दिलेले शब्द पूर्णच करतो , लवकरच राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील , मी व आ . काशिनाथ दाते सर आणि रूपेश ढवण यांच्या सोबत च्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे , पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या सोबत मंत्रालयात बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत तोडगा काढू , असा शब्द माजी खा . डॉ . सुजय विखे पाटील यांनी निघोज येथे बोलताना दिला .
आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश ढवण यांचे ९ व्या दिवशी आमरण उपोषण माजी खा. डॉ सुजय विखे पाटील व आ . काशिनाथ दाते सर यांच्या हस्ते , मान्यवर , शेतकरी , वारकरी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत सोडण्यात आले.
शेतकरी नेते रुपेश ढवण यांनी शेतकरी कर्जमाफी , कांदा भाववाढ , कांदा निर्यात शेतकर्यांच्या या व इतर प्रश्नांसाठी बुधवार दि . २० ते काल गुरुवार दि . २८ या गेल्या ९ दिवसांपासून आमरण उपोषण केले. शासकीय पातळीवर त्यांची कोणीही दखल घेतली नाही.
मात्र शेतकरी , वारकरी व ग्रामस्थांच्या आग्रहाखातर भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील वराळ , पंचायत समितीचे माजी सदस्य शंकरराव नगरे , सुप्याचे माजी सरपंच दत्ता पवार व इतरांनी मध्यस्थी करीत उपोषणाबाबत रुपेश ढवण यांची भेट घेत त्यांची समजूत काढत थेट माजी खा.डॉ सुजय विखे पाटील व आ . काशिनाथ दाते सर यांच्या शी बुधवार दि.२७ रोजी चर्चा केली. ही चर्चा यशस्वी झाली व त्याची फलश्रुती काल गुरुवार दि.२८ रोजी माजी खा. डॉ सुजय विखे पाटील व आ . काशिनाथ दाते यांनी उपोषणस्थळी भेट दिली .
माजी खा . डॉ . विखे पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वत : व आ . काशिनाथ दाते यांच्या सोबत राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे व पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याशी चर्चा करीत हा शेतकरी हिताचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
आ . काशिनाथ दाते सर यांनी लवकरच रुपेश ढवण व त्यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे व पणनमंत्री जयकुमार रावळ यांना भेटणार असून राज्य सरकारने या राज्यव्यापी आमरण उपोषणाची दखल घेण्यासाठी योग्य तो पर्याय काढणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी रुपेश ढवण यांनी दिवंगत केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील, राज्याचे जलसंपदा व पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खा. डॉ सुजय विखे पाटील यांच्या कार्याचे कौतुक करीत हा शेतकऱ्यांचा प्रश्न फक्त सत्ताधारी विखे पाटील परिवारच सोडवू शकतात , अशी खात्री व्यक्त करत , राज्य शासनाच्या माध्यमातून आ . काशिनाथ दाते शेतकर्यां चे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करतील , अशी अपेक्षा व्यक्त केली.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत , भाजपाचे राज्य कार्यकारी परिषदेचे सदस्य विश्वनाथ कोरडे , महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश खोसे पाटील , पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ता उनवणे , पंचायत समितीचे माजी सदस्य दिनेश बाबर , खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन प्रसादराव शितोळे , उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे , मंडलाध्यक्ष किसनराव शिंदे , शेतकरी नेते महेंद्र पांढरकर , हभप पोपट महाराज तनपुरे , हभप धनंजय महाराज गोरडे , सरपंच पंकज कारखिले , सोनाली सालके , सोनीताई पवार , जालिंदर लंके , राजू देशपांडे , भाऊसाहेब लामखडे , गणेश कवाद , राधू ढवळे , उत्तम लामखडे , बाबाजी पठारे , गोपीनाथ रसाळ , परिसरातील शेतकरी , वारकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.