ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सिल्लोड तालुक्यात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू
प्रतिनिधि :- गजानन काळे औरंगाबाद

*सिल्लोड तालुक्यात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू*
सिल्लोड :- संजय नथ्थु उटाडे , सावखेडा वाडी ता.सिल्लोड ( वय 45 ) या शेतकऱ्याचा शेतात काम करीत असतांना दुपारी 1 वाजे दरम्यान वीज पडून मृत्य झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं , एक मुलगी , आई असा परिवार आहे. शेतात खरिपाची तयारी करीत असताना वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. याच वेळी वीज कोसळून संजय यांचा मृत्यू झाला. त्यांना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.