
*!! विषय गंभीर तिथे शिवसेना खंबीर !!*
शिवसेना खासदार *श्री.अरविंद सावंत साहेब*
शिवसेना खासदार *श्री.राहुल शेवाळे साहेब*
विभागप्रमुख *श्री.आशिष चेंबुरकर साहेब*
शिवसेना आमदार *श्री.अजय चौधरी साहेब*
यांच्या मार्गदर्शनाखाली
मा.नगरसेवक *सचिन पडवळ* यांच्या प्रत्नांमुळे
शाखाप्रमुख *हनुमंत हिंदोळे* यांच्या सहकार्याने
————————————————————-
आपल्या प्रभाग क्रमांक २०६ (२१४) मधील *शिवडी पूर्व* येथील शिवडी कोळीवाडा,गिरी नगर, इंदिरानगर रामगड राजीव गांधीनगर मधील *अंदाजे १५०० कुटुंबियांचे रेशन* शिधावाटप गेली कित्येक वर्षांपासून *कोळीवाडा येथे मोबाईल रेशनिंग व्हॅन* मध्ये मिळायचे.परंतु आता सरकारने *मोबाईल रेशनिंग व्हॅनला बंदी* आल्यामुळे या सर्व कुटुंबियांचे रेशनिंग शिवडी पश्चिम येथील *शिवडी क्राॅस रोड येथे* करण्यात आले. परंतु त्या ठिकाणी जाण्यासाठी फाटक ओलांडून जावे लागते *शिवडी रेल्वे फाटक हे सकाळी ८.३० ते ११.३० बंद* असल्यामुळे नागरिकांना शिधावाटप केंद्र ठिकाणी जाण्यासाठी समस्या यायची.स्थानिक रहिवाशांनी विशेषतः महिलांनी हि तक्रार माझ्याकडे केल्यानंतर मी रेशनिंग अधिकाऱ्यांना काही दिवसांपूर्वी *पत्र* दिले होते. स्थानिक रहिवाशांना घेऊन सदर *रेशनिंग ऑफिसमध्ये जाऊन अधिकाऱ्यांसोबत चर्चा* केली व नंतर आपण दिलेल्या पत्राच्या आधारे अशी विनंती केली की पूर्वीच्या ठिकाणी म्हणजेच *शिवडी कोळीवाडा येथे शिधावाटप केंद्र सुरू करावे* ही विनंती केल्या नंतरही प्रश्न सुटत नाही
————————————————————-
असे लक्षात आल्यावर गेल्या मंगळवारी परळ रेशन कार्यालयातील अधिकारी *श्री. बुरसुळे* यांना परिस्थितीची जाणीव करून दिल्यानंतर त्यांनी येत्या *८ दिवसात हे दुकान पुन्हा शिवडी कोळीवडा* येथे चालू करतो असे आश्वासन दिले होते आज या नवीन दुकानाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून आज पासून हे दुकान *शिवडी कोळीवाडा येथे शिधावाटप केंद्र दुकान नं ०९* चालू आले आहे याचा *शुभारंभ* करण्यात आला, यावेळी माजी नगरसेविका श्वेता राणे, शाखाप्रमुख, बैजू हिंदोळे, महिला शाखा संघटक शुभदा पाटील, श्रीमती श्रद्धा घोसाळकर, ( शिधावाटप अधिकारी )
श्री.विजयकुमार वाघ, ( सहायक शिधावाटप अधिकारी )
श्री.तुषार रेडीज,( शिधावाटप निरीक्षक ) आदी अधिकारी तसेच मोठ्या प्रमाणात महिला देखील उपस्थित होत्या, या नवीन शिधावाटप दुकानामुळे मुळे शिवडी पूर्व विभागातील १५०० कुठुंबाना दिलासा मिळाला असून शिवसेना पक्षाने न्याय दिल्या बद्दल स्थानिक नागरिकांमध्ये विशेषतः महिलांनी शिवसेना पक्षचे आभार मानले
आपला नम्र
*सचिन देवदास पडवळ*
⛳मा.शिवसेना नगरसेवक🏹