वैजापुर तालुक्यात सोलर पॅनलचे मोठया प्रमाणात नुसकान.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वैजापुर तालुक्यात सोलर पॅनलचे मोठया प्रमाणात नुसकान.
संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापुर तालुका मौजे आवलगाव येथे जोरदार वादळी वाऱ्यामुळे अव्वलगाव येथे सोलर पंपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच मोठ्या प्रमाणात झाडे, विजेच्या तारा, पत्र्याचे शेड यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. तसेच परिसरामध्ये सोलर पॅनल वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे त्यामुळे परिसरात शेतकरांचे मोठे प्रमाणात नुकसान झाली आहे महावितरण ला कंटाळून शासनाने शेतकऱ्या च्या सोई साठी शासकीय अनुदानित सोलर ऊर्जा पंप योजना सुरु केली परंतु अशा योजाना मध्ये जी कंपनी सोलर पंप शेतकाऱ्या च्या शेतात बसवीतात ते कॉट्रेक्ट न देता शासनाने स्वतः त्या योजनेची अमलबजावणी करावी तसेच तो सोलर पैनल जमीन च्या आत चांगला सेट करावा जेणेकरून अशा वादळामध्ये सुद्धा त्या सोलर पंपास काहीही होणार नाही अव्वलगाव येथील शेतकऱ्याची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झालेली आहे सदर अव्वलगाव येथे पत्रकार संदीप पगारे पत्रकार दिपक गायकवाड यांनी स्वतः पडताळणी केली शेतकऱ्याचे जे काही नुकसान झालेले आहे ते त्वरीत भरपाई मिळावी अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकऱ्याने सरकार ला विनंती केली.