नवी मुंबई:-(सानपाडा)-बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले – शिवसेना संसदरत्न खासदार श्री नरेशजी म्हस्के यांनी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र नूतनीकरणाचे दिले आश्वासन.
पत्रकार निता चोरगे नवी मुंबई महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
नवी मुंबई:-(सानपाडा)-बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले – शिवसेना संसदरत्न खासदार श्री नरेशजी म्हस्के यांनी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र नूतनीकरणाचे दिले आश्वासन.
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले –
शिवसेना संसदरत्न खासदार श्री नरेशजी म्हस्के यांनी लोकसभा निवडणुक प्रचारादरम्यान ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र सानपाडा सानपाडा समिती यांस आपल्या विरंगुळा केंद्राचे नूतनीकरण नक्कीच करून दिले जाईल असा शब्द दिला होता.त्यास अनुसरून जनता दरबार वाशी येथे खासदार महोदयांना ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र समितीने तसे निवेदन देखील दिले होते.अखेर त्याची आज पूर्तता होऊन श्री.नरेशजी म्हस्के साहेबांनी सदर कामाचे भूमिपूजन केले.या कामाच्या पूर्ततेसाठी उपजिल्हाप्रमुख तथा माजी परिवहन समिती सदस्य श्री.विसाजी लोके आणि उपशहर प्रमुख श्री.गणेश पावगे यांनी सतत खासदार महोदयांच्या संपर्कात राहून खासदार निधी उपलब्ध करून देण्यासाठी अथक प्रयत्न केले.
या भूमिपूजन प्रसंगी जिल्हाप्रमुख श्री द्वारकानाथ भोईर,शहर प्रमुख श्री. विजय माने,स्थानिक नगरसेविका सौ.ऋचा ताई ( म्हात्रे) पाटील ,उपजिल्हाप्रमुख अजित सावंत,श्री.रामचंद्र पाटील,उपशहर प्रमुख सूर्यकांत झेंडे,निहाल वास्कर,मनोज भोईर दिलीप ठाकूर,देवेंद्र चोरघे, उमेश लोहोट,सिध्देश गिद्दी,युवा सेना पदाधिकारी आदेश तावरे महिला आघाडी सौ.सुरेखाताई गव्हाणे,सौ राजश्रीताई येवले तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे श्री.मारुती कदम,श्री.विष्णुदास मुखेकर,श्री.विठ्ठल गव्हाणे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.