कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कुर्ला कमानी:-( मुंबई ) – फिनिक्स मार्केट सिटीच्या मॅनेजमेंटची ट्राफिकला बगल !!

पत्रकार मनेष मिस्त्री मुंबई शहर उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

कुर्ला कमानी:-( मुंबई ) – फिनिक्स मार्केट सिटीच्या मॅनेजमेंटची ट्राफिकला बगल !!

मुंबई :- कुर्ला पश्चिम कमानी येथील एलबीएस मार्गालगत असलेले फिनिक्स मार्केट सिटी या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असून वाहन चालकांबरोबर प्रवाशी हि त्रस्त झालेले आहेत. या ठिकाणी होत असलेल्या वाहतुकीच्या कोंडीची प्रमुख कारणे तपासण्यासाठी स्वतः संपादक प्रल्हाद चव्हाण आणि त्यांची टीम फिनिक्स मार्केट सिटी या ठिकाणी पोहोचली असता असे लक्षात आले की कुर्ला कमानी सिग्नल वरती असलेले ट्रॅफिक पोलीस कर्मचारी हे वाहनांना अडवून चलान करणे याकडेच यांचे लक्ष असलेले दिसून आले. ट्रॅफिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांचे प्रथम कर्तव्य ट्रॅफिक कमी करणे आहे हे ते विसरूनच गेलेले दिसतात.जे वाहन चालक – मालक टॅक्स पे करतात तसेच प्रवाशी यांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे लागत आहे.फिनिक्स मार्केट सिटी च्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ऑटो रिक्षा चालकांचा या वाहतूक कोंडीत सिंहाचा वाटा आहे.या ठिकाणी फिनिक्स मार्केट सिटी चे ट्राफिक हटवणारे कर्मचारी हेच रिक्षाचालकांबरोबर मिळालेले दिसून येतात यामागचे गुड काय हा मोठा प्रश्न आहे.

RPS STAR NEWS च्या अचानक केलेल्या स्टिंग ऑपरेशन मुळे या सर्वांची एकच धांदल उडाली.यातील काही फिनिक्स मार्केट सिटी च्या कर्मचाऱ्यांची संवाद साधला असता असे लक्षात आले कि,रिक्षा चालक यांना दम दाटी करतात.या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस का तैनात नसते? ट्राफिक पोलीस आणि फिनिक्स मार्केट सिटी यांच्यात काही संबंध आहेत का? अशा शंका बऱ्याच लोकांच्या मनात उपस्थित होत आहेत. फिनिक्स मार्केट सिटीच्या जरा पुढे जाताच एलआयजी पोलीस ठाण्याचे पोलीस व्हॅन यांनी ब्यारिगेटर लावून चेक पोस्ट पुढे उभे केले आहे.येथील संबधीत कर्मचारी आणि अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही काही समाधानकारक उत्तरे दिलेली नाहीत.यामुळे ट्रॅफिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. चुकीच्या पद्धतीचे ट्रॅफिक नियोजन यात स्पष्ट होत आहे. फिनिक्स मार्केट सिटीचे संबंधित संचालक हि त्या ट्रॅफिक साठी जबाबदार आहेत.यातच रिक्षा चालकांची प्रवाशांसाठी होत असलेली वादा वाद मोठ्या अनुचित प्रकारात परिवर्तित होण्याची शक्यता टाळता येत नाही.फिनिक्स मार्केट सिटीच्या ट्रॅफिक कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त संबंधित इन्चार्ज मॅनेजर कोणीही समोर आलेले नाहीत. परंतु पुढे जाऊन काही अनुचित प्रकार घडला तर यास फिनिक्स मार्केट सिटी चे संचालक ( मॅनेजमेंट) मंडळ जबाबदारी घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.अशा गंभीर ट्रॅफिक विभागाकडे राज्य शासन लक्ष देणार का ? मुख्य रोड साईड बेकायदेशीर पार्किंग त्याच्यावर बंदी आणणार का ? अशा बेकायदेशीर पार्किंग वर कारवाई करणार का ? असे अनेक प्रश्न मनाला भेडसावत आहेत. तातडीने संबंधित ट्रॅफिक पोलीस कर्मचारी अधिकारी आणि राज्य शासनाने याकडे लक्ष देऊन ट्रॅफिकचा प्रश्न मार्गी लावावा आणि वाहन चालक आणि प्रवासी यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button