ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

गुंडेवाडी (ता.वाई) येथे नवीन स्मशानभूमी शेड इमारतीचे भूमीपूजन करताना मोहनराव जाधव,शंकरराव शिंदे,प्रल्हाद गाढवे,शशिकांत मांढरे,चंद्रकांत मांढरे आदी.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

गुंडेवाडी (ता.वाई) येथे नवीन स्मशानभूमी शेड इमारतीचे भूमीपूजन करताना मोहनराव जाधव, शंकरराव शिंदे, प्रल्हाद गाढवे, शशिकांत मांढरे, चंद्रकांत मांढरे आदी.

ना.मकरंद पाटील यांच्या प्रयत्नाने वाई तालुक्यात विकासकामे प्रगतीपथावर – मोहनराव जाधव
वाई, दि. 8 – महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून वाई तालुक्यात विविध विकासकामे प्रगतीपथावर आहेत. जनतेने ना. पाटील यांना साथ द्यावी, असे आवाहन वाई तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मोहनराव जाधव यांनी केले.

गुंडेवाडी (ता. वाई) गावासाठी नवीन स्मशानभूमी शेड इमारत मंजूर झाले असून त्या कामाचे भूमिपूजन श्री. जाधव व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. गुंडेवाडी- पिराचीवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शशिकांत मांढरे म्हणाले की, गुंडेवाडी गावासाठी स्मशानभूमीला जागा उपलब्ध होत नव्हती. गावाची जुनी स्मशानभूमी ओढ्याच्या काठी असल्याने तेथे जाण्यासाठी रस्ता करता येत नव्हता. त्यामुळे ग्रामस्थ व नातेवाईंकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. गुंडेवाडी गाव पांडवगडाच्या डोंगरांनी वेढले असल्याने ग्रामस्थांकडे पिकाऊ जमीनीचे क्षेत्र कमी आहे. त्यामुळे स्मशानभूमीला जागा उपलब्ध होत नव्हती. ग्रामस्थांची ही अडचण लक्षात घेऊन श्री. पोपट, विलास व उमेश सर्जेराव अंबिके या बंधूनी त्यांचेकडील जागा उपलब्ध करून दिली. या भागाचे जननायक मंत्री ना. मकरंद पाटील यांनी तात्काळ स्मशानभूमी शेड इमारत व सुशोभिकरण कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याबद्दल गावक-यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ना. पाटील यांनी गुंडेवाडी- पिराचीवाडी ग्रामपंचायत लहान असूनही दोन गावांसाठी गेल्या पाच वर्षांत साडे तीन कोटींची विकासकामे उपलब्ध करून दिली आहेत. त्यामध्ये पिराचीवाडी येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता, वाढीव पाणीपुरवठा टाक्या, पाईपलाईन, सिमेंट रस्ता या कामांचा समावेश आहे.

कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी उपसभापती शंकरराव शिंदे, खरेदी विक्री संघाचे व्हॉइस चेअरमन प्रल्हाद गाढवे, गुंडेवाडी पिराचीवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत मांढरे, माजी सरपंच श्री दत्तात्रय पवार, धावडी सोसायटीचे व्हॉइस चेअरमन प्रकाश पवार, सोसायटीचे संचालक कृष्णा पेटकर, किसनराव अंबिके, शिवाजी पवार, निवृत्ती कदम, माजी सैनिक अंकुश पवार, नथू पेटकर, परशुराम पवार, विजय मांढरे, विनायक पवार, बापूराव अंबिके, सुरेश पेटकर, शामराव कदम, अमोल भादिर्गे, अशोक रेणुसे, अनिल मांढरे, विठ्ठ्ल पेटकर, गुलाबराव पवार, महेश पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button