फलटण:-धुमाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा .
मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
धुमाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा .
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी , संचलित कृषी महाविद्यालय, फलटण येथील कृषीकन्यांनी कृषी कार्यानुभव उपक्रम २०२२-२३ अंतर्गत धुमाळवाडी येथील जि. प. प्रा.शाळेत संविधान दिन साजरा केला .यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री खुडे सर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले .तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद ,विद्यार्थी ,सर्व कृषीकन्या यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले.शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणे केली . त्याचबरोबर मुंबईच्या ताज हॉटेलवर झालेल्या भ्याड हल्यात जीव गमावलेल्या शहिदांना व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कृषीकन्या स्नेहल शिंदे , ऋतुजा रणवरे ,प्राची व्यवहारे , ऋतुजा आवारे,महेश्वरी मांजरे ,तेजस्विनी शिंदे , ऋतुजा पवार ,सर्व शिक्षकवर्ग तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.या सर्व कृषीकन्यांना प्राचार्य डॉ.एस.डी.निंबाळकर , प्रा. एन.एस ढालपे , प्रा. एन . ए. पंडित, प्रा.एस.वाय.लाळगे यांचे मार्गदर्शन लाभले .