ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पार्ले:-(कराड) येथे मोदी सरकारच्या १२ वर्षपूर्तीनिमित्त भाजपची नियोजन बैठक; पर्यावरण दिन, योग दिन व आणीबाणी स्मरण कार्यक्रमांवर भर.

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पार्ले (ता.कराड) येथे मोदी सरकारच्या १२ वर्षपूर्तीनिमित्त भाजपची नियोजन बैठक; पर्यावरण दिन, योग दिन व आणीबाणी स्मरण कार्यक्रमांवर भर.

पार्ले, ता. कराड : – भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय कार्यालय तसेच प्रदेश कार्यालय यांच्या सूचनेनुसार आणि भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष मा. अतुल भोसले (बाबा) तसेच कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार मा. मनोज घोरपडे (दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली पार्ले (ता. कराड) येथे बूथ अध्यक्ष व शक्ती केंद्र प्रमुखांची मासिक बैठक उत्साहात पार पडली. मोदी सरकारच्या १२ वर्षपूर्तीनिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन या बैठकीत करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टी सातारा महिला जिल्हाध्यक्षा तथा कार्यक्रमाच्या जिल्हा संयोजिका मा. सौ. तेजस्विनीताई घोरपडे यांनी ५ जून जागतिक पर्यावरण दिन, २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन तसेच २५ जून आणीबाणीच्या ५१ वर्षांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली. आगामी सर्व उपक्रम गावागावांत प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक नियोजन व कार्यपद्धतीबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
मतदार यादी शुद्धीकरण (SIR) अभियानाबाबत वैभव मुगदुमकर तसेच अंगणवाडी सेविका मीनाक्षीताई नलवडे यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी महिला मोर्चा अध्यक्षा सौ. सीमाताई घार्गे यांच्या हस्ते तेजस्विनीताई घोरपडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
बैठकीत महिला मोर्चा अध्यक्षा सौ. सीमाताई घार्गे, कामगार नेते नवनाथ पाटील, सचिन शिंदे, दादासाहेब डुबल आणि सागर पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. तसेच मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील विविध विकासकामे व जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सदस्या प्रियंकाताई पळसे, सरचिटणीस अश्विनीताई काशीद, माजी सरपंच जयश्रीताई पवार, जिल्हा पदाधिकारी नम्रताताई कुलकर्णी, माजी जिल्हा सरचिटणीस अश्विनी नलवडे, श्रीधर माने, श्रीकांत पिसाळ, ओंकार पाटील, प्रमोद शिंदे, सुहास पवार, अतुल शहा, प्रकाश पवार, संभाजी पिसाळ, नितेश डुबल, विकास घाडगे, धनाजी माने, सतीश डांगे, मोहन चव्हाण, विवेक चव्हाण, प्रवीण घोलप, सुमित शहा, अमित पवार, विकास पवार, शुभम पवार, राजन पाटील, अनिल डुबल, सुनील जाधव, युवराज जाधव, सचिन यादव, अमित डुबल, मुरलीधर पोळ, योगेश फाटक, विजय थोरात, निखिल थोरात, संदीप माने, गणेश डुबल, राजू पवार, इस्माईल पटेल, शशिकांत नलवडे, हेमंत मिसाळ, प्रदीप पाटील, सागर पळसे, शुभम नलवडे, हर्षल नलवडे यांच्यासह कोपर्डे मंडलातील सर्व बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीचे प्रास्ताविक कोपर्डे मंडलाध्यक्ष तुकाराम नलवडे यांनी केले. तर मंडल सरचिटणीस पुरंदर जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सोशल मीडिया प्रमुख बलवीर नलवडे व संचित नलवडे यांनी विशेष सहकार्य केले.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button