सातारा:-शितल दानवले यांच्या एका व्हिडिओमुळे दिव्यांग कुटुंबाच्या आयुष्यात बदल.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
सातारा:-शितल दानवले यांच्या एका व्हिडिओमुळे दिव्यांग कुटुंबाच्या आयुष्यात बदल.
उदरनिर्वाहासाठी काम मिळेल तिकडे दिव्यांग अक्षय आणि मोनिका चव्हाण एका छोट्या निलेशला घेऊन भटकंती करणारे बेलदार समाजातील कुटुंब बांधकाम मजूर म्हणून तुटपुंज्या पैशात प्रपंच चालवतात.हे करत असताना तीन वर्षाचा कर्णबधिर असलेल्या निलेशला सांभाळण्यासाठी कोणी नसल्याने दोरीने बांधून ठेवायचे हा नित्याचा प्रकार पाचगणी जवळील दानवलीच्या शीतल दानवले यांनी निलेशला दोरीने बांधलेला व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. हा व्हिडिओ सातारच्या संवेदनशील तहसीलदारांनी पाहिला माहिती घेतली आणि त्यांनी स्वतः कुटुंबाचा पाचगणी परिसरात शोध घेतला.बोलायला गाव फत्त्यापूर सातारा असून जवळ कोणतेच कागदपत्र नाहीत, राहण्यासाठी घर नाही, पैसे नसल्याने आजारी मुलाच्या आजारपणाकडे दुर्लक्ष अशी मन हे लावून टाकणारी कहानी समोर आली.
या चव्हाण दाम्पत्याच्या मदतीला धावून आलेले जे महाराष्ट्राने आजवर अनुभवलेले संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री वैद्यकीय पक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी तर त्या कुटुंबाला कार्यकर्त्यांमार्फत ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल येथे बोलावून घेतले. छोट्या निलेशची सर्व तपासणी केली योग्य उपचारणे त्याला ऐकू आणि बोलायला येईल हे डॉक्टरांचे शब्द एकदाच आई बापाच्या अश्रूंचा बांध फुटला एका व्हिडिओने एका बाळाबरोबर दिव्यांग दांपत्याची कहाणी समाजासमोर आणली आणि अवघ्या दोन दिवसात सातारच्या तहसीलदारांनी त्याला नागरिकत्वाचा दाखला रेशन कार्ड आधार कार्ड तयार करून जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कुटुंबाला दिले.तसेच सातारच्या गटविकास अधिकाऱ्यांनी घरकुलासाठी शक्यती मदत करण्यासाठी पुढाकार घेतला.
सोबत शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मुंबई उपनगर प्रमुख सुरेश शिंदे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कांदिवली चारकोप मालाड विभाग प्रमुख महेंद्र शेंडगे उपस्थित होते.