कराड:-स्वर्गीय शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशालेत शिवजयंती उत्साहात साजरी.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारक मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
स्वर्गीय शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशालेत शिवजयंती उत्साहात साजरी.
कराड:-
प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही स्वर्गीय शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशालेत शिवजयंती साजरी करण्यात आली.सर्वप्रथम प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ हेमलता जंगम यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानंतर प्रशालेतील विद्यार्थिनींनी संतोष निकम सर यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती “राजा रयतेचा” हे भित्तिपत्रक तयार केले होते त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रशालेतील इयत्ता पाचवी मधील कुमारी शताक्षी गोरे हिने पोवाडा तर आठवी मधील अदिती वडगावकरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वरती आपले विचार व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा केवळ जयंती दिवशी विचार न करता त्यांचे त्यांचे विचार प्रत्येकाने दररोज आचरणात आणले पाहिजेत सर्वधर्मसमभाव ही शिवाजी महाराजांची शिकवण, रयतेसाठी राज्य ही त्यांची राज्य करण्याची पद्धत आजच्या लोकप्रतिनिधींनी अमलात आणली पाहिजे . रयत सुखी तर राजा सुखी हीच भावना राज्यकर्त्यांनी राज्य करताना लक्षात ठेवली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आणि प्रेरणास्त्रोत आहे याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे. या कार्यक्रमास प्रशालीच्या उपमुख्याध्यापिका छाया कुंभार, पर्यवेक्षिका सुनीता अवघडे, ज्येष्ठ शिक्षक जगदीश कुंभार, महेंद्र भोसले, बाळासाहेब देसाई, अनिल थोरात तसेच सर्व सहकारी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रुपाली काकडे मॅडम यांनी केले तर आभार अमृत गिजरे सर यांनी मानले.