ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पाचगणी:-म.फुले मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेची बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

म.फुले मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेची बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार.

पांचगणी दि: थंड हवेचे ठिकाण असलेल्या पांचगणी (गोडवली) येथील महात्मा फुले मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या ३९८ सभासदांना अथक लढाई आणि परिश्रमातून प्लॉटचे वाटप यशस्वीपणे केले आहे. यामुळे काहींना पोटशूळ उठल्याने संस्थेची बदनामी करून सभासदांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. त्यांचेवर संस्थेच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वानुमते करण्यात आला.
याबाबत महात्मा फुले मागासवर्गीय सहकारी घरनिर्माण संस्था पाचगणी येथील सभासदांनी सांगितले की, संस्थेची नाहक बदनामी करून काही विघ्न संतोषी लोक सभासदांची दिशाभूल करत आहेत परंतु सर्व सभासदांच्या उपस्थितीत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या कामकाजाबद्दल सभासदांनी विश्वास व्यक्त केला.पांचगणी ता. महाबळेश्वर येथील संस्थेच्या कार्यालयात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेची नाहक बदनामी करणारा विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची एकमुखी मागणी सभासदांनी केली आहे. तसा ठराव सर्व सभासदांनी एकमताने मंजूर केला.
या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रमेश पांडुरंग शिंदे हे होते. तर यावेळी सभेस उपाध्यक्ष सुनिल शिंदे , प्र.स. सचिव आनंद भिमराव कांबळे ,संचालक जयसिंग जाधव, आशिष लाभशंकर दवे, बगाराम पवार, गोविंद बाबुराव कासुर्डे, भिमराव गणपत रांजणे, राम पुरूषोत्तम चव्हाण, सौ.भागुबाई चंद्रकांत गंगावणे, श्रीमती शैला हरि गोळे, विजयकुमार गणपतराव अहिवळे, मधुकर महादेव गंगावणे, अभिजीत सुरेश शिंदे, जगदीश विठ्ठल भगत तसेच संस्थेचे सर्व सभासद उपस्थित होते.

महात्मा फुले मागासवर्गीय सहकारी गृह निर्माण संस्थेच्या १९८५ च्या स्थापनेनंतर कै. भीमराव कांबळे आणि पा. म शिंदे गुरुजी यांच्या चळवळ आणि संघर्षातून त्यांच्याच आशीर्वादाने आज सभासदांना घरांचे स्वप्न पूर्ण होत आहे. या चालू वर्षात सभासदांना रीतसर प्लॉटचे वाटप ही केले आहे. असे असताना काही लोक अर्धवट माहितीच्या आधारे पराचा कावळा करून आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करत होते तो सभासदांनी व पदाधिकाऱ्यांनी हाणून पाडला आहे. काही जण स्वार्थासाठी संस्थेची विनाकारण बदनामी करत आहेत. त्यांना कदापिही सोडणार नाही. सभासदांच्या सूचनेनुसार त्यांचेवर कारवाई करणार असल्याचे यावेळी
विजयकुमार गणपतराव अहिवळे यांनी सांगितले.

काही झारीतील शुक्राचार्य संस्थेच्या हिशोब, भ्रष्टाचार आणि कामाची दिशाभूल करणारी माहिती देवून बदनामी करीत आहेत. संस्थचेच्या रीतसर अशा ३९८ सभासदांना प्लॉट चे वाटप केल्यावर काहीना प्लॉट ची स्वप्न दिसू लागली आहेत. आणि ज्यावेळी यश मिळाले त्याचे भागीदार होण्याचे भाग्य मिळत नसल्याने हा बदनामीचा कांगावा काही मंडळी करीत आहेत. त्यांना आव्हान आहे. दरवर्षी आम्ही संस्थेचे ऑडिट करून घेत असतो त्यामुळे तुम्ही निश्चिंत रहा. सभासद तुम्हाला पुरते ओळखून आहेत. असे या वेळी आनंद कांबळे यांनी सांगितले.

आनंद कांबळे यांनी संस्थेच्या ताळेबंद पत्रकाचे वाचन केले. याला सभासदांनी मान्यता दिल्यावर विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेमध्ये 34 वर्षे पूर्वी ज्यांनी आपल्या कष्टाचे पैसे दिले आहेत ते प्लॉट पासून वंचित राहणार नाही किंवा त्यांच्या वारसदारांना हे प्लॉट दिले जातील याबद्दल आता कुणाचेही दुमत राहिलेले नाही ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेले आहे आता विरोधकांनी कायदेशीर कारवाईला सामोरे जावे माफीनामा लिहून देऊ नये असे स्पष्ट केले आहे.
———————-+——————
फोटो -थंड हवेचे ठिकाण असलेल्या पाचगणी येथील टेबल लँड खाली महात्मा फुले गृहनिर्माण संस्थेचे वाटप केलेल्या प्लॉटचे छायाचित्र (छाया- निनाद न्यूज ,सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button