वाई:-राष्ट्रीय ग्राहक दिन निमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत वाई व तहसिल कार्यालय वाई यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक दिन वाई तहसिल कार्यालय येथे साजरा.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष
RPS STAR NEWS
वाई:-राष्ट्रीय ग्राहक दिन निमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत वाई व तहसिल कार्यालय वाई यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक दिन वाई तहसिल कार्यालय येथे साजरा.
दि – 24 राष्ट्रीय ग्राहक दिन निमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत वाई व तहसिल कार्यालय वाई यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक दिन वाई तहसिल कार्यालय येथे साजरा करण्यात आला. आजच्या कार्यक्रमास वाईच्या तहसीलदार मा. सोनाली मिटकरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या तसेच तहसिल कार्यालय पुरवठा अधिकारी श्री समीर मिर्झा सर, पुरवठा निरीक्षक ओंकार सनातन, मध्य महाराष्ट्र प्रांत महिला सह प्रमुख सौ शुभदा नागपूरकर, रेशनिंग दुकान संघटना उपाध्यक्ष श्री संजय जायगुडे, ग्राहक पंचायत सातारा जिल्हा कोषाध्यक्ष श्री किशोर फुले व ग्राहक पंचायत वाई तालुका अध्यक्ष श्री जेबले सर या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्राहक पंचायत सातारा जिल्हा सदस्य श्री बाळासाहेब कोलार सर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेस पुष्पहार व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी व सदस्यांचे स्वागत तहसील कार्यालय यांच्यातर्फे श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. ग्राहक पंचायत वाई तालुका अध्यक्ष सतीश जेबले सर, मध्य महाराष्ट्र प्रांत महिला सह प्रमुख सौ शुभदा नागपूरकर व वाई तहसीलदार सोनाली मिटकरी मॅडम यांनी उपस्थितांसमोर आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे आभार तालुका पुरवठा अधिकारी श्री समीर मिर्झा सर यांनी केले. आजच्या कार्यक्रमास ग्राहक पंचायत सातारा जिल्हा सदस्य श्रीमंत होनराव, वाई तालुका संघटक राहुल जायगुडे, सचिव मानसी पटवर्धन, कोषाध्यक्ष सविता चव्हाण, महिला आघाडी प्रमुख रत्नमाला जाधव, जेष्ठ सदस्य विनायक पवार, वाई तालुका सदस्य सारिका गवते, पुष्पा भोज, सुरेखा भोसले, गौरी शिंदे, चित्रा जाधव हे सर्व उपस्थित होते. तसेच रेशनिंग दुकानदार, तालुक्यातील महिला बचत गट सदस्या व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.