पुसेसावळी:-ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांचे पुसेसावळी नगरीमध्ये जंगी स्वागत.
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष
RPS STAR NEWS
ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांचे पुसेसावळी नगरीमध्ये जंगी स्वागत.
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज खात्याचे कॅबिनेट मंत्री ना.जयकुमार गोरे भाऊ यांचे विविध मान्यवरांसह भारतीय जनता पार्टी पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.
मंत्री जयकुमार गोरे यांची खास तयार केलेल्या रथातून सवाद्य मिरवणूक सावंता माळी मंदिर आझाद चौक पासून सुरू झाली ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले तर ग्रामस्थांनी हार-तुरे देऊन त्यांचा सत्कार केला. दत्त चौक पुसेसावळी येथे क्रेनच्या सहाय्याने पुष्पहार,जेसीबी मधून पुष्पवृष्टी, फटाक्याची मोठ्या प्रमाणावर आतिषबाजी अशा पुसेसावळी जि.प.गटाचे युवा नेतृत्व विक्रमबाबा कदम यांच्या नेटक्या नियोजनामुळे जल्लोषात झालेल्या या स्वागतामुळे मंत्री गोरे ही भारावून गेले.
यावेळी भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष मा.धैर्यशीलदादा कदम,कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. मनोजदादा घोरपडे,भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस मा. रामकृष्ण वेताळ साहेब, भाजपा रहिमतपुर मंडल अध्यक्ष मा.भीमरावकाका पाटील, कराड मंडल अध्यक्ष मा.शंकरकाका शेजवळ, उद्योजक मा.सत्वशील कदम, गोरेगाव वांगीचे माजी सरपंच मा.रवीदादा कदम यांचेसह पुसेसावळी जि.प.गटातील सर्व भाजपा प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.