कृषी व व्यापारक्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरेगाव तालुक्यात डिझेल चोरीचे प्रमाण वाढलेले पेट्रोल पंप चालक चिंताग्रस्त.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

कोरेगाव तालुक्यात डिझेल चोरीचे प्रमाण वाढलेले पेट्रोल पंप चालक चिंताग्रस्त.

कोरेगाव दि: सर्वसामान्य माणसाला उद्योजक होण्यासाठी अनेक वित्तीय संस्थेचे कर्ज काढावे लागते. त्यानंतर महसूल विभागातील परवाने काढल्यानंतर प्रत्यक्षात उद्योगाला सुरुवात केली जाते. कोरेगाव तालुक्यातील पेट्रोल पंप चालक व उद्योजक अजित कुमार माने यांनी नुकताच नवीन पेट्रोल पंप उभारणी केले आहे. या पेट्रोल पंपातील डिझेलच्या टाकीमधील सुमारे तीन हजार लिटर डिझेल चोरीस गेल्याची घटना घडली असून याबाबत कोरेगाव पोलीस ठाण्यात रिचार्ज लिखित तक्रार करण्यात आलेले आहेत.
याबाबत अजित कुमार माने रा. शिवाजीनगर हाउसिंग सोसायटी ता. कोरेगाव जिल्हा सातारा यांनी दि: १० नोव्हेंबर २०२३ रोजी कोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. चिमणगाव येथील गट नंबर ८२२ ता. कोरेगाव जिल्हा सातारा याठिकाणी सातारा- पंढरपूर रस्त्यावरील त्यांनी हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन कंपनीच्या पेट्रोल पंपाचे काम सुरू केले आहे. यासाठी त्यांनी डिझेल व पेट्रोल साठी दोन मोठ्या टाक्या बसवल्या होत्या. त्यापैकी डिझेलच्या टाकीमध्ये तीन हजार लिटर डिझेल भरण्यात आले. हे डिझेल हिंदुस्तान पेट्रोल कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीने पाठवले होते. त्याची सविस्तर माहिती सुद्धा या तक्रारीमध्ये दिलेले आहे.
रात्रीच्या वेळी अनोळखी लोकांनी हे तीन हजार लिटर डिझेल टाकीतून चोरून नेल्याची त्यांनी लेखी तक्रार केलेली आहे. अशाच घटना अनेक पेट्रोल पंप वर घडलेल्या आहेत. सदरच्या प्रती जिल्हा पोलीस अधीक्षक, सातारा यांनाही देण्यात आलेले आहे. विशेष बाब म्हणजे सदर तीन हजार लिटर डिझेल चोरी प्रकरणी पोलीस यंत्रणेने सखोल तपास करून या डिझेल चोरीच्या घटनेची नोंद घेतली आहे. आता जलद गतीने तपास करून चोरट्यांच्या मुस्क्या आवळ्याव्या अशी मागणी सर्वच पेट्रोल डिझेल पंप चालकाने केलेली आहे.
एखादी बारीक सारीक वस्तू चोरीला गेल्यास ती सापडणे अवघड असते. परंतु, चक्क तीन हजार लिटर डिझेल चोरी होऊन सुद्धा त्याचा तपास लागत नाही. याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झालेली आहे. वास्तविक पाहता या डिझेलची चोरी व त्याचा उपयोग हा खरं म्हणजे वाहनाशी व शेती, बांधकाम व्यवसायाला लागणाऱ्या मोटर व इतर वाहनांसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे त्या दृष्टीने सखोल तपास करून पोलीस यंत्रणेने डिझेल चोरीच्या आरोपींना अद्दल घडवावी असे सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्रनाथ जाधव व मधुकर आठवले यांनी सांगितले आहे.
——————-&–६&&&—+———-

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button