औरंगाबाद:-सुरक्षा रक्षकाच्या सतर्कते मुळे टळली हानी.
प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे औरंगाबाद:-9022552792

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
दि. 21/01/2023
सुरक्षा रक्षकाच्या सतर्कते मुळे टळली हानी.
चिकलठाणा एमआयडीसी येथील ई शक्ती बायनरी प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नं. W-79, येथे दि. 21 ऑक्टोबर 2023 पहाटे 3.40 ते 4.15 च्या दरम्यान दोन अज्ञात चोरांनी चोरीचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षारक्षक हिरालाल चंद्रे हे रात्रपाळीसाठी कर्तव्यावर तैनात होते चोर आत शिरतात चंद्रे यांना आवाज आला व त्यांनी लगेचच त्या दिशेने धाव घेतली. यावेळी कंपनीच्या आत शिरलेल्या चोरास त्यांनी पाहिले असता लगेचच चोराने हातात असलेल्या पाईपने चंद्रे यांच्यावर हल्ला केला परंतु सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे व निडरतेमुळे सुरक्षा रक्षकाने प्रतिकार केला व चोरांना परतावून लावले. चोरांनी कंपनी च्या बाहेर निघून लगेचच सुरक्षारक्षकावर दगडफेक केली. यावेळी सुरक्षारक्षकाने त्वरित फिल्ड अधिकारी श्री मारुती भोसले यांना या संदर्भात माहिती दिली व भोसले यांनी क्षणाचा विलंब न करता श्री गजानन सर्विसेसची रॅपिड ऍक्शन टीम घेऊन घटनास्थळी दाखल झाले. यामुळे कंपनीत होत असलेली चोरीसारखी अप्रिय घटना टळली.
चंद्रे यांच्या उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ कामगिरीबद्दल श्री गजानन सर्व्हिसेस चे संचालक श्री गजानन पिंपळे व संचालिका सौ कीर्ती पिंपळे यांच्या हस्ते चंद्रे सहकुटुंबाचा शाल, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या पूर्वीही चंद्रे यांच्या अश्याच कार्याबद्दल सत्कार करण्यात आला होता. तसेच ई शक्ती बायनरी प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक श्री नंदकुमार मुळे यांच्या तर्फे सुद्धा सत्कार करण्यात आला. श्री गजानन सर्व्हिसेस या कंपनीचे संचालक हे माजी सैनिक असल्याने कंपनीची सैनिकी पार्श्वभूमी आहे. याच सोबत कंपनीतील इतर अधिकारी सुद्धा सैन्य दलातून तसेच पोलीस विभागातून सेवानिवृत्त असल्याने कंपनीचे काम शिस्तबद्ध व चोख पार पाडले जाते. सत्कार प्रसंगी श्री प्रफुल तिळवे, श्री गौरव पिंपळे, श्री शरद शिंदे, श्री.योगेश सोनटक्के, श्री रामचंद्र सोनवणे, श्री मनोज पाटील, श्री गणेश बरथरे व श्री राजू भाले व इतर कर्मचारी उपस्थित होते.