क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीगोंद्याचे भूमिपुत्र वैभव दारकुंडे यांची महाराष्ट्र रणजी संघात निवड.

पत्रकार राधाजी व्यवहारे श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

 श्रीगोंद्याचे भूमिपुत्र वैभव दारकुंडे यांची महाराष्ट्र रणजी संघात निवड.

श्रीगोंदा तालुक्यातील कौठा या छोट्याशा गावातील होतकरू क्रिकेटपटू वैभव दारकुंडे यांची आगामी रणजी ट्रॉफी २०२६-२७ साठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. वैभवच्या या उल्लेखनीय निवडीमुळे श्रीगोंदा तालुक्यासह कौठा व परिसरातील क्रिकेटप्रेमी, खेळाडू आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामीण भागातील युवकाने क्रिकेट संघामध्ये पदार्पण करण्याची दुर्मिळ संधी वैभवला प्राप्त झाली आहे. छोट्याशा कौठा तालुका श्रीगोंदा या गावातील वैभवने आपले आई-वडील, गाव व तालुक्याचे नाव महाराष्ट्र रणजी सामन्यात पदार्पण करून रोशन केले आहे.

क्रिकेटची कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ क्रिकेटविषयीची प्रचंड आवड, मेहनत, जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर वैभवने आपल्या खेळाची वाटचाल सुरू ठेवली. क्रिकेटमध्ये मोठे यश मिळविण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याने गाव सोडून पुणे गाठले. पुण्यात राहून त्याने नियमित सराव व मेहनत सुरू ठेवली. त्याच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर महाराष्ट्राच्या रणजी संघातील निवडीच्या रूपाने मोठे यश मिळाले आहे.

वैभवने २०२० पासून श्रीगोंदा तालुक्यातील क्रिकेटपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या श्रीगोंदा प्रीमियर लीग (SPL) मध्ये सलग चार वर्षे खेळाडू म्हणून सहभाग घेतला. या स्पर्धेत आपल्या अष्टपैलू खेळाने त्याने सर्वांची मने जिंकली. विशेष म्हणजे, SPL मध्ये पदार्पणाच्या पहिल्याच वर्षी त्याने ‘ Emerging Player of the Tournament ‘ हा पुरस्कार मिळवून आपल्या गुणवत्तेची झलक दाखवून दिली होती.

SPL च्या माध्यमातून तालुक्यातील अनेक गुणी खेळाडूंना संधी मिळाली असून वैभव दारकुंडेची रणजी संघातील निवड ही या व्यासपीठाच्या प्रवासातील अभिमानास्पद बाब मानली जात आहे. वैभवच्या निवडीने SPL मधील सर्व खेळाडू, आयोजक तसेच क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

वैभवच्या महाराष्ट्र रणजी संघातील निवडीबद्दल श्रीगोंदा तालुक्यातील नागरिक, क्रिकेटपटू, मित्रपरिवार आणि श्रीगोंदा प्रीमियर लीगच्या आयोजकांनी त्याचे अभिनंदन केले असून, रणजी क्रिकेटमधील पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

‘कौठा ते महाराष्ट्र रणजी संघ’ हा वैभवचा प्रवास ग्रामीण भागातील अनेक होतकरू खेळाडूंसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे.

वैभव दारकुंडे यांची रणजी संघात निवड झाल्याबद्दल श्रीगोंदा प्रीमियर लीग, कोळगाव चे अध्यक्ष शिवराज देशमुख, उपाध्यक्ष ओंकार नलगे, सचिव दिलीप पानसरे, भाऊसाहेब जगताप व सर्व सदस्य यांनी अभिनंदन व्यक्त केले आहे.


RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button