आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पारनेर:-सुप्यातील देवीची पालखी परंपरा अखंड; नवरात्रापूर्वीच भक्तिमय वातावरण.

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) पारनेर:-सुप्यातील देवीची पालखी परंपरा अखंड; नवरात्रापूर्वीच भक्तिमय वातावरण.

सुपा (राजकुमार इकडे)ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेची साक्ष देणाऱ्या सुपा गावातील देवीच्या पालखी सोहळ्याला यंदाही भक्तिभावाचे वातावरण लाभले आहे. नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला राहुरीहून निघालेली देवीची पालखी जामगाव मार्गे सुप्यात दाखल होण्याची परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे.

या देवीच्या नावाने इनामी जमीन असून, त्या जमिनीत बोरीच्या झाडांची लागवड केली जाते. देवीच्या पालखीसाठी याच बोरीच्या लाकडाचा वापर करण्याची प्राचीन परंपरा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या सोहळ्याला केवळ धार्मिक श्रद्धाच नाही, तर ऐतिहासिक वारशाचीही जोड आहे.

पालखीचा प्रवास आणि मानकरी

परंपरेनुसार भाद्रपद पौर्णिमेला राहुरी येथून पालखीचा प्रवास सुरू होतो. तेथून ती जामगाव येथे येते. संस्थानिक महादजी शिंदे आणि सुप्याचे शाबूसिंग पवार यांनी ही पालखी दर्शनाची परंपरा सुरू केल्याचे जुन्या जाणत्यांकडून सांगितले जाते.

जामगाव येथील शिंदे वाड्यात तसेच कै. पंढरीनाथ पाटील यांच्या वाड्यात पालखीच्या आरतीचा मान असतो. त्यानंतर पालखी सुप्याकडे मार्गस्थ होते.

सुप्याचे राजे पुंडकेश्री यांचे वंशज संग्रामसिंह पवार व जगदेव पवार यांना सुप्यात पालखीच्या आरतीचा मान परंपरेने आहे. पालखीच्या दर्शनासाठी सुपा परिसरातील सुमारे २५ गावांमधून भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. दिवसभर दर्शनानंतर सायंकाळी शहाजणपूरच्या ग्रामस्थांकडून पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात येते.

सुप्याची ओळखच पालखीशी जोडलेली

सुपा हे गाव यादवकालापासून ‘सुपेकाडी’ म्हणून परिचित असल्याचे ऐतिहासिक संदर्भ सांगतात. त्याच काळापासून ही पालखी परंपरा सुरू असल्याचे मानले जाते. पुढे शाबूसिंग पवार राजांनी सुपे गावाला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यामुळे सुप्याची ऐतिहासिक ओळख, पवार घराण्याची परंपरा आणि देवीचा पालखी सोहळा यांचे अतूट नाते निर्माण झाले आहे.

दरम्यान, पूर्वी पालखी आणण्यासाठी वापरला जाणारा पारंपरिक मार्ग आता बदलल्याने स्थानिकांमध्ये चर्चा सुरू आहे. हा पालखी सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून सुपा परिसराच्या इतिहास, श्रद्धा आणि संस्कृतीचे प्रतीक असल्याने, पारंपरिक मार्ग आणि या परंपरेशी निगडित ऐतिहासिक ठिकाणांचे संवर्धन करावे, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.

2) पारनेर:-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणगाव येथे पेविंग ब्लॉकचे उद्घाटन.

पारनेर, सुपा (राजकुमार इकडे)

आज बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी सुपा एमआयडीसी येथील नामांकित कंपनी सी एम एल या कंपनीमार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणगाव मशीद या ठिकाणी सीएसआर फंडातून पेविंग ब्लॉक देण्यात आले त्यानिमित्ताने आज सी एम एल कंपनीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी शाळेमध्ये उपस्थित राहून उद्घाटन केले यावेळी कंपनीचे प्लांट हेड श्री विठ्ठल मुकुंदवार प्रोडक्शन हेड अभिजीत यादव एच आर हेड राहुल महाजन मटेरियल हेड धनंजय जोशी सीनियर ऑफिसर अश्विन शेळके कॉन्ट्रॅक्टर अमोल गाडेकर अक्षय गाडेकर अविनाश उबाळे हे उपस्थित होते.
त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी गावातील मान्यवर श्री राहुल दादा शिंदे पाटील सरपंच महेश काका देशमुख प्राध्यापक शिंदे सर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ प्राजक्ता चहाळ व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
प्लांट हेड विठ्ठल मुकांवर प्रोडक्शन हेड अभिजीत यादव या चार खेड राहुल महाजन यांनी आपल्या मनोगतामध्ये शाळेचे विशेष कौतुक करून शाळेतील व्यवस्थापनाबद्दल आनंद व्यक्त केला.
त्यावेळेस कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील उपाध्यापक श्री पठारे संदीप यांनी केले तर सर्व मान्यवरांचे स्वागत शाळेतील उपाध्यापिका श्रीमती गंधाडे रूपाली यांनी केले सर्वांचे आभार शाळेतील मुख्याध्यापिका श्रीम वंदना आसणे यांनी मानले

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button