आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-अध्ययन निष्पत्ती आधारित अध्यापन पद्धती वापरा: अनिल कदम.

प्रतिनिधी विनोद पाटील:-9762274165

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

अध्ययन निष्पत्ती आधारित अध्यापन पद्धती वापरा: अनिल कदम.

फलटण (प्रतिनिधी)
शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी निपुण भारत अंतर्गत अध्ययन निष्पत्ती आधारित अध्यापन पद्धती शिक्षकांनी वापरावी;असे विचार गिरवी व आरडगांव फरांदवाडी केंद्रांचे उपक्रमशील प्रयोगशील अभ्यासू शिक्षणतज्ञ केंद्रप्रमुख अनिल कदम यांनी जिल्हा परिषद केंद्र शाळा गिरवी ता फलटण जि सातारा येथील शिक्षण परिषदेत अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
शिक्षण परिषदेच्या अध्यक्षपदी गिरवी व आरडगांव फरांदवाडी केंद्रांचे उपक्रमशील प्रयोगशील अभ्यासू शिक्षणतज्ञ केंद्रप्रमुख अनिल कदम होते.
प्रास्ताविक भगवंतराव कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र वाघ यांनी मानले.सुत्रसंचलन सौ जयश्री कदम यांनी केले.
याप्रसंगी बोलताना अनिल कदम पुढे म्हणाले की, विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त शैक्षणिक उपक्रम, प्रकल्प वर्गात राबविण्यात यावेत.अध्ययन स्तर निश्चित करावा आणि त्यानुसार शैक्षणिक विकासासाठी आवश्यक शिक्षण पध्दती,तंत्रे, शैक्षणिक साहित्य,ई-लनिंग साधने, मुल्यमापन साधने वापरावीत. विद्यार्थ्यांना भयमुक्त व तणाव रहित वातावरणात आनंददायी कृती युक्त पध्दतीने अध्ययन अध्यापन करावे.
याप्रसंगी शैक्षणिक सर्वेक्षण टप्पा दोन विश्लेषण या विषयावर सुनील जाधव, निपुण भारत अध्ययन निष्पत्ती आधारित अध्यापन पद्धती या विषयावर सुनील तिवाटणे,शाळा व्यवस्थापन समिती विषय व संदर्भ या विषयावर दत्तात्रय सुतार, शैक्षणिक बालसभा व शैक्षणिक ग्रामसभा या विषयावर तृप्ती कुमठेकर यांनी मार्गदर्शन केले.
या शिक्षण परिषदेसाठी गिरवी,निरगुडी,बोडकेवाडी,धुमाळ वाडी,जाधववाडा, जननीमळा,गुरवदरा,हराटीमळा,चाहुरमळा,माळेवस्ती, येथील जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक शाळा मधील मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button