सातारा जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने पालखी मार्गावर सेवा सुविधा पुरवण्यात सज्ज….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
सातारा जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने पालखी मार्गावर सेवा सुविधा पुरवण्यात सज्ज….
सातारा दि: श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात २६ ते ३० जून या कालावधीमध्ये सातारा जिल्ह्यातील पाडेगाव ता. खंडाळा ते साधूबुवाचा ओढा ता. फलटण या मार्गावरून मार्गक्रमण करणार आहे. वारकऱ्यांना आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गाचे मार्गक्रमण आरोग्यदायी व्हावे. यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग वारकऱ्यांना सुख सुविधा पुरविण्यास सज्ज झाले आहेत.
सातारा जिल्ह्यातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त ४७८ नोंदणीकृत दिंड्या जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. यासाठी शासकीय १२, खाजगी १२० असे एकूण १३२ वैद्यकीय संस्था आणि १४० अंतर रुग्ण उपचारांसाठी खाटा उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर ६१ प्राथमिक शाळा,११ समाज मंदिर तैनात करण्यात येणार आहेत.
क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे व सातारा जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्यासह वैद्यकीय सेवेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्ग पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या आगमनाच्या प्रतीक्षेत आहेत .
१५ ठिकाणी तात्पुरते दवाखाने उभारणीचे काम सुरू आहे. तसेच ४६ ठिकाणी आरोग्य दूत व दुचाकीस्वार फिरते वैद्यकीय पथक आणि ६ रुग्णवाहिका, ८१ वैद्यकीय मदत पथके, पाणी शुद्धीकरण पथके, हॉटेल्स नियंत्रण पथके, त्याच्या पाण्यासाठी टँकर फिलिंग पॉईंट पथके व नियंत्रण पत्रके यासाठी ८१० आरोग्य अधिकारी व कर्मचारी सेवेमध्ये समाविष्ट होणार आहेत.
पालखी सोहळ्यासाठी सातारा जिल्ह्यात 26 जून ते 30 जून वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये यासाठी ४०५ ठिकाणी पाणीपुरवठा सुविधा आहेत .
सातारा जिल्ह्यातील ६७ पिण्याच्या पाण्याचे टँकर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणार आहेत त्याचबरोबर स्थानिक पातळीवरील मोठ्या प्रमाणात सामाजिक संस्था मदतीसाठी सक्रिय झालेल्या आहेत.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या साठी मोठ्या प्रमाणात राजकीय नेते कार्यकर्ते व पोलीस बंदोबस्त यामुळे सामान्य वारकऱ्यांना दर्शन घेताना खूप मोठी अडचण निर्माण होते. काही वेळेला वयोवृद्ध वारकऱ्यांना धक्काबुक्की सहन करावी लागते याबाबतही चांगली उपाययोजना करावी अशी मागणी वयोवृद्ध वारकरी महीगाव ता. जावळी येथील ह भ प रामराव पवार, ह भ प अशोक भोसले यांनी केली आहे.