आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाबळेश्वर:-कुरोशी येथे श्री हनुमान मंदिराचे भव्य उद्घाटन व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न.

पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION & RPS STAR NEWS NATIONAL PRESIDENT & EDITOR MR. PRALHAD CHAVAN – 8208717483

कुरोशी येथे श्री हनुमान मंदिराचे भव्य उद्घाटन व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न.

तालुका महाबळेश्वर मधील मौजे कुरोशी येथे श्री हनुमान मंदिराचे भव्य उद्घाटन व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात पार पडला. संपूर्ण गाव भगव्या पताकांनी, फुलांच्या सजावटीने आणि मंगल ध्वनींनी नटले होते. मंदिर परिसरात मंत्रोच्चार, आरती आणि जयघोषांनी वातावरण भारावून गेले होते.
नूतन मंदिरात विधिवत पूजा, अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठा विधी पार पडले. उपस्थित भाविकांनी श्री हनुमंताच्या चरणी नतमस्तक होत गावाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. गावातील सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ आणि तरुणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेत भक्तीरसात रंग भरला.
या सोहळ्यास नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निवडून आलेले उमेदवार अजित सपकाळ व संजय मोरे, जिल्हा शिवसेना प्रमुख विशाल भाऊ सपकाळ, तालुका प्रमुख गणेश उतेकर, गणेश सपकाळ, आनंदा धनावडे, राम सपकाळ तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कोयना, सोळशी, कांदाटी विभागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांचा ग्रामस्थांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
मंदिरातील आकर्षक सजावट, फुलांनी सुशोभित श्री हनुमंताची मूर्ती आणि भक्तांच्या ओठांवरचा “जय श्रीराम, जय हनुमान”चा गजर यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. या सोहळ्यामुळे कुरोशी गावात एकतेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक अभिमानाचा अनोखा संगम पाहायला मिळाला.
ग्रामस्थांच्या एकजुटीने साकारलेला हा सोहळा कुरोशी गावाच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनात नवा अध्याय लिहिणारा ठरला.

पत्रकार अध्यक्ष – उत्तमभालेराव आर पी एस स्टार न्यूज तालुका महाबळेश्वर.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button