वडूज:-खटाव तालुक्यातील धोंडेवाडी येथे पावसाने शाळेच्या खोलीचे पत्रे उडाले.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
खटाव तालुक्यातील धोंडेवाडी येथे पावसाने शाळेच्या खोलीचे पत्रे उडाले.
वडूज दि: खटाव तालुक्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे पण आज सायंकाळी अचानक कोसळणाऱ्या वादळ वारा व पावसाने शाळेच्या खोल्याची पत्रे उडाली व अनेक घरांना पडझड झाल्याची माहिती हनुमंत भोसले यांनी दिली आहे.
धोंडेवाडी येथे चक्रीवादळसह पाऊसात जिल्हा परिषद केंद्र शाळा धोंडेवाडी सह घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सायंकाळी पाच वाजून 40 मिनिटांनी अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे लोकांची दैना उडाली. सदर सकाळची शाळा असल्यामुळे फार मोठी हानी झाली नाही.
शाळेच्या वरंडयासह पाच खोल्या व गावातील काही घरांची पडझड झाली . विजेच्या धक्यानेएका शेळीचा जागेच मृत्यू झाला. शाळेचे इलेक्ट्रॉनिक वस्तू, पाच एल ई डी टीव्ही , चार पंखे, एक कॉम्प्युटर, अन्न धान्य, शाळेचे ढोल ताशे, सोलर इन्व्हर्टर पूर्णपणे खराब झाले आहेत.
घटनास्थळी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक, तलाठी व गावकरी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा काम सुरु केले आहे. रात्री गावातील विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे पंचनामा करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या उद्या सकाळी सर्व ग्रामस्थांशी चर्चा करून पंचनामे करून त्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तसेच सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्यांनी केलेली आहे. आचारसंहिताचे कोणताही भाव न करता गोरगरीब शेतमजूर व शेतकरी यांना जास्तीत जास्त मदत करावी. अशी धोंडेवाडी ग्रामस्थ हनुमंत भोसले व कृणाल गडांकुश, मुकुंद माने व संजय जगताप यांनी केली आहे.
—————————————–++–
धोंडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा व घराची झालेली पडझड (छाया- अजित जगताप, वडूज)