चिखली:-(वाई)-जिल्हास्तर शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत बापूसाहेब शिंदे माध्यमिक विद्यालय चिखलीचे सुयश; २ खेळाडूंची विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
जिल्हास्तर शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत बापूसाहेब शिंदे माध्यमिक विद्यालय चिखलीचे सुयश; २ खेळाडूंची विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड.

वाई येथील बापूसाहेब शिंदे माध्यमिक विद्यालय चिखली (मोरजीवाडा – मालतपूर ) विद्यार्थ्यांनी कराड येथे पार पडलेल्या सातारा जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट व दमदार कामगिरी करून विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. या खेळाडूंची निवड आता कोल्हापूर विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी झाली आहे.
यशस्वी खेळाडू:
* भूमी दिनेश वाडकर ( उंच उडी)
* ऐश्वरी दिनेश वाडकर ( 80 मी . हर्डल्स)
या खेळाडूंनी धावणे आणि उंच उडी स्पर्धांमध्ये हे यश संपादन केले. विशेष म्हणजे दोघीही सख्या बहिणी आहेत .
तसेच श्रावणी प्रदीप मांढरे, आशिष महेश फणसे, रुद्र निलेश वाडकर, सार्थक संजय उंबरकर , ईश्वर शिवाजी देसाई मुलांनी विविध जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग घेऊन उत्तम कामगिरी केली .
तसेच तालुका स्तरीय खोखो स्पर्धेत अतिशय उत्तम खेळ करीत19 वर्षाखालील मूली व 17 वर्षाखालील मुलींनी दुसरा क्रमांक प्राप्त केला .
या यशामागे प्रशिक्षक श्री कर्णवर सर , श्री डोईफोडे सर यांचे समर्पित प्रशिक्षण, मुख्याध्यापक श्री गोरे सर यांचे प्रेरणादायी नेतृत्व तसेच सर्व शिक्षकवृंदांचे प्रोत्साहन मोलाचे ठरले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्था अध्यक्ष श्री बापूसाहेब शिंदे, उपाध्यक्ष श्री विकास (आण्णा) शिंदे, कृष्णाई शिक्षण संस्थेचे पदाधिकारी,चिखली मालतपूर ग्रामस्थ ,तसेच आजी-माजी विद्यार्थ्यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.




