आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कराड:-कला वाणिज्य महाविद्यालय येथे एड्स जनजागृती कार्यक्रम.

प्रतिनिधी संतोष बोंगाळे कराड:-9923900840

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

कला वाणिज्य महाविद्यालय येथे एड्स जनजागृती कार्यक्रम.
एड्स ही एक जागतिक समस्या आहे. या समस्येतून अनेक देशात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही देशाची तरुण पिढी अक्षरशः या भयंकर रोगामुळे नेस्तनाबूत झाली आहे. अशा या रोगाचा फायदा आपल्या देशामध्ये होण्यापासून रोखण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी प्रत्येक वर्षी १ डिसेंबर ते ७ डिसेंबर असा एड्स जनजागृती सप्ताह आयोजित केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य महाविद्यालय , उंडाळे येथे एड्स सप्ताह निमित्त राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थिनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स विषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामीण रुग्णालय उंडाळे येथील आरोग्य समुपदेशक श्री किरण कांबळे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. त्यांनी किशोरावस्थेतील शारीरिक बदल तसेच एड्स या गंभीर आजाराची कारणे, लक्षणे , परिणाम आणि या आजारापासून आपण कशाप्रकारे बचाव केला पाहिजे. यासाठी जनजागृती पर व्याख्यान दिले . तसेच सेवा सामाजिक विकास संस्थेच्या श्रीम. नम्रता कांबळे आणि श्रीम. दिपाली पाटील यांनीही मुलींच्या किशोरवयीन अवस्थेतील समस्या याविषयी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मुलींना आरोग्य विषयक जागृत करण्याचे काम केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. जावेद शेख होते. या कार्यक्रमाचे समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी प्रा. प्रदीप चोपडे होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. तनुजा पाटील यांनी केले तर आभार प्रा एन डी भोसले यांनी मांडले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button