खटाव:-वडूज बस स्थानकात विद्यार्थी करतात दररोज मॉक ड्रिलचा सराव….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वडूज बस स्थानकात विद्यार्थी करतात दररोज मॉक ड्रिलचा सराव….
वडूज दि: हुतात्म्याच्या बलिदानाने राज्यात नावलौकिक प्राप्त केलेल्या वडूज ता. खटाव येथील एस.टी. बस स्थानक म्हणजे विद्यार्थी वर्गासाठी मॉक ड्रिल सराव करणारे ठिकाण आहे. या ठिकाणी अपघात घडल्यास अनेकांना जाग येणार आहे.
खटाव तालुक्यातील वडूज एस.टी. बस स्थानक या ठिकाणाहून सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी एस.टी. बसची ये जा होते. हैदराबाद – सोलापूर, मुंबई, पुणे मार्गावर सुद्धा बस धावतात. परंतु, खटाव तालुक्यातील खेड्यापाड्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना शाळेतून घरी परत येताना वडूज बस स्थानकाचा आधार घ्यावा लागतो. एस.टी. बसची संख्या कमी आणि प्रवाशांची संख्या जास्त याचे गणित जुळवताना वडूज बस स्थानकाच्या एस.टी. आगार प्रमुख व संबंधित कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. सायंकाळी वडूज परिसरातील शाळा महाविद्यालय सुटल्यानंतर व नोकरी व्यवसाय निमित्त येणाऱ्या प्रवाशांसोबत शालेय विद्यार्थ्यांची एस.टी .बस पकडताना धडपड करावी लागते. अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. बस स्थानक आणि स्थानकाच्या बाहेर सुद्धा विद्यार्थ्यांची गर्दी होते. याबाबत खरं म्हणजे संस्थाचालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. असं काही प्रवाशांनी सांगितले.
वडूज बस स्थानकामध्ये सुरक्षा रक्षकाची गरज असून त्याबाबत एस.टी. महामंडळाने विचार करावा. अशी मागणी काँग्रेसचे कार्यकर्ते दाऊद खान व येरळवाडीचे सामाजिक कार्यकर्ते धनंजय चव्हाण यांनी केली आहे.