श्रीरामपूर:-उंदिरगाव येथे वरुंडी माता यात्रा उत्साहात साजरी.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
उंदिरगाव येथे वरुंडी माता यात्रा उत्साहात साजरी.
माळेवाडी ( प्रतिनिधी ) श्रीरामपुर तालुक्यातील उंदिरगाव येथील जागृत देवस्थान वरुंडी माता यात्रा उत्सव याही वर्षी सालाबाद प्रमाणे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पवित्र गंगेच्या पाण्याने जलभिषेक करण्यात आला व भव्य मिरवणूक काढण्यात आली व नंतर महाप्रसाद तसेच सायंकाळी देवीची भक्ती गीतांचा व पारंपारिक गाण्यांचा ओळ्या या कार्यक्रमाने उत्साहात यात्रेची सांगता करण्यात आली यावेळी उपस्थित भाविकांना ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेश पाटील गलांडे यांनी यात्रा उत्सव तसेच वरुंडी माता हे जागृत देवस्थान असून नवसाला पावणारी देवी आहे भाविकांनी श्रद्धेने मनोभावे देवीची आराधना करावी देवीचा महिमा अगाध असून द्दष्ठांचा नाश करणारी आदिशक्ती आदिमाया या देवीची आपल्या सर्वावर कृपा असावी तसेच बळीराजासाठी वरून राजाने वेळेवर व नियमित पाऊस रूपाने कृपा दृष्टीने करावी असे सुरेश पाटील गलांडे म्हणाले
प्रसंगी राजेंद्र पाटील पाऊलबुद्धे विरेश पाटील गलांडे . बाळासाहेब निपुंगे,मच्छिंद्र आढाव,दत्तात्रेय नाईक, विलास आढाव,संजय सोमवंशी,गोरख पवार,सुखदेव मोरे,देविदास मोरे,चांगदेव मोरे,साईनाथ मोरे, संजू बर्डे . राजू मोरे, बाप्पू मोरे रामदास फुलवर, सदोबा आव्हाड .अशोक मोरे,अंबादास गोधडे, गोकुळ मोरे, अंबादास मोरे,पांडू मोरे, पत्रकार संदिप पगारे , पत्रकार दिपक गायकवाड राजू पवार व इतर मान्यवर उपस्थित होते उपस्थित सर्वांचे चित्रसेन पाटील गलांडे यांनी आभार मानले.