श्रीरामपूर:-शिर्डी लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत – प्रचार मात्र थंडच …
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS
शिर्डी लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत – प्रचार मात्र थंडच …
श्रीरामपूर ( RPs स्टार न्युज ) श्रीरामपूर शिर्डी लोकसभा मतदारसंघात तीन प्रमुख उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होत आहे.मतदान 20 दिवसावर आलेले असतांना देखील उमेदवारांच्या प्रचारांमध्ये विशेष असा उत्साह दिसून आल्याचे दिसत नाही. शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खा.सदाशिव लोखंडे तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार मा.खा. भाऊसाहेब वाघचौरे यांच्यासह वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्यात लढत होत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून खा.सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसुलमंत्री यांच्या उपस्थितीत तर मा.खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह जिल्हातील काही प्रमुख नेत्यांच्या उपास्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले. तसेच बुधवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उत्कर्षा रुपवते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या उमेदवारांच्या प्रचारांमध्ये विशेष असा उत्साह दिसून येत नाहीये.