आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडी

मेढा:-जावळीत रस्त्याच्या निकृष्ट कामाने गाडी पलटी…. ठेकेदार फरार…

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION & RPS STAR NEWS NATIONAL PRESIDENT & EDITOR MR. PRALHAD CHAVAN – 8208717483

1) जावळीत रस्त्याच्या निकृष्ट कामाने गाडी पलटी…. ठेकेदार फरार…

मेढा दि: मराठी भाषेमध्ये टांगा पलटी घोडे फरार असे ऐकण्यात आले. परंतु, निकृष्ट दर्जाच्या जावळी तालुक्यातील विकास कामाने रस्त्यावरच गाडी पलटी… ठेकेदार फरार.. अशी गत पाहण्यास मिळत आहे. दरम्यान, जोपर्यंत राजाची मर्जी आहे. तोपर्यंत प्रधानाचे कुणीही वाकडे करू शकत नाही. अशी चर्चा मेढा , कुडाळ व आलेवाडी परिसरात रंगू लागलेली आहे.
जावळी तालुक्याचे महत्वाचे ठिकाण असलेल्या मेढा नगरीमध्ये जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील कुडाळ ,पाचवड, मेढा मार्गे चिपळूण खेड या राज्य महामार्गाचे काम सुरू आहे.या कामात नामांकित ठेकेदाराकडून कामाचे गुणवत्ता राखली गेली नाही. त्यांच्यावर कधीही कारवाई होऊ शकत नाही. दहा वर्ष देखभाल दुरुस्तीची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. तरी ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाच काळजी घ्यावी लागत आहे. या रस्त्यावर अपघात होत आहेत.
कडक उन्हाळ्याच्या तडाक्यात गुरुवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी जावळी तालुक्यात आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या मेढा नगरीच्या डोंगरावर मानकुमरे पॉईंट जवळ एम एच ११.१४एम व्हि ७३०७ ही गाडी रस्त्यावर खडी मध्ये अडकून आडवी झाली.सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी हा दुसरा अपघात आहे.
जावळी तालुक्यातील गांजे गांवचे पती पत्नी या गाडीतून प्रवास करत होते. त्यांना स्थानिकांच्या मदतीने मेढा पोलीसांनी बाहेर काढले. त्यांना फारशी जखम झाली नसली तरी या अपघाताने एक बाजू समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच मेढा पोलीस ठाण्याची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तातडीने पंचनामा केला असला तरी काही गोष्टींचा उल्लेख टाळला आहे असाही पुढे आले आहे. कडक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रस्त्याच्या कामासाठी पाणी मारणे गरजेचे आहे. ठेकेदारी घेताना पाणी मारण्याचे ही बिल अदा केले जाते. मग, या ठिकाणी त्याचे काम करताना धूळ उडू नये म्हणून पाणी का मारले नाही.? पाणी नेमके कुठे मुरले? त्याचा आता जाब जनता विचारू लागलेली आहे.
या रस्त्याच्या कामासाठी जागोजागी खडीचे ढीग टाकले गेलेले आहेत. मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट तयार होत आहेत. रस्त्याच्या बाजूला कुठेलेही सुचना फलक नसल्याने वाहन चालकाची मात्र तारांबळ होत आहे. या रस्त्याच्या कामासाठी कण्हेर धरणातील पाण्याचा उपसा केला जात आहे. स्थानिक भूमिपुत्रांच्या शेतीला पाणी मिळत नाही. सदर ठेकेदार हे लोकप्रतिनिधी व मंत्र्यांच्या अत्यंत जवळचे व विश्वासू सहकारी असून त्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांचे नातेवाईक महायुतीच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे. या अपघातामुळे या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामामुळे संबंधित ठेकेदारांचे डोळे उघडले जातील की झोपेचे सोंग घेतले जाईल. याची उलट सुलट चर्चा सुरू झालेली आहे. दरम्यान, सदर रस्त्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे झाले असून पुढील दहा वर्ष त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आमच्यावर आहे . या रस्त्याबाबत कोणी काळजी करू नये. असे संबंधितांनी सांगितले आहे.

2) कराड:-ओमकार रानडे याची ” इंजिन कॅडेट ” पदी निवड.

कराड येथील मर्चंट नेव्ही अधिकारी प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन करणारी एकमेव नामवंत अकॅडमी असा नावलौकिक प्राप्त आर के मरीन करीअर अकादमीचा गुणवंत कॅडेट ” ओमकार रानडे (सातारा) याची “इंजिन कॅडेट” पदी यशस्वी निवड झाल्याची माहिती संचालक राहुळकुमार खडके यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, ओमकार रानडेचे माध्यमिक शिक्षण डी. जी.कॉलेज सातारा येथून पूर्ण झाले.तर मर्चंट नेव्ही कॅडेटचे प्रशिक्षण ” इंटरनॅशनल मेरीटाईम अकॅडमी ” चेन्नई ( तामिळनाडू) येथून यशस्वी पूर्ण झाले. मर्चंट नेव्ही मध्येच करिअर घडवन्याचे ओमकारचे स्वप्न होते.समुद्रावरील धाडसी व दर्यावर्दी जीवन ,वेगवेगळे देश पाहण्याच्या संधी, उच्च राहणीमान, भरपूर पगार यामुळे शिपिंग क्षेत्र त्याला खुणावत होते. परंतु या प्रशिक्षणाचा खर्च आपणाला झेपेल का? हा प्रश्न सतत भेडसावत होता.त्याने हा मनोदय आपली आजी श्रीमती उज्वला गोडसे व आई श्रीमती आसावरी रानडे यांना बोलून दाखवला.बेताची आर्थिक स्थिती असणाऱ्या आजी व आई यांनी कितीही कष्ट करावे लागले तरी ओमकारला प्रशिक्षणाला पाठवणारच हा ठाम निर्धार केला.ओमकरला वडील नसल्याने या दोघींनी हा खर्च करणे सर्वानाच अशक्यप्राय वाटत होते.परंतु इतर कोणाकडेही लक्ष न देता हे दिव्य आपण पार पाडायचेच हा चंग दोघींनी बांधला. पुढारी पेपर मधील आर. के मरीन अकादमीचा लेख वाचून राहुलकुमार खडके यांना संपर्क केला असता..त्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली .ओमकारनेही सर्व आवश्यक त्या परीक्षा व सीडीसी प्रमाणपत्र यासास्विरीत्या मिळविले.याचाच एक परिणाम म्हणून हे यश त्यास प्राप्त झाले आहे.याचे सर्व श्रेय राहुलकुमार खडके सरांचे मार्गदर्शन व आपली आजी व आई यांचे अपार कष्ट याचेच फळ आहे.शेवटी म्हणतात ना ” जिथे प्रबळ असते तिथे कसलीही अवघड परिस्थिती असो त्यावर मात करून यशाची वाट ही गवसते.” म्हणूनच संचालक राहूलकुमार खडके यांनी त्याची पुढील सर्व जबाबदारी स्वीकारली असून ५१०००/ हजार रुपये शिष्यवृत्ती जाहीर केली आहे.लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राहूलकुमार खडके यांनी दिली.

3) सातारा जिल्ह्यामध्ये आला तर तुमच्यासोबत नाहीतर तुमच्या विना….

सातारा दि: सातारा जिल्हा परिषद व अकरा पंचायत समिती निवडणुका होऊन तीन आठवडे झाले आहेत. अनेक जण सहलीवरून परतले असले तरी अद्याप सातारा जिल्हा परिषद निवडी होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे आता राष्ट्रवादी व शिवसेनेने भाजपला इशारा दिला आहे. आला तर तुमच्या सोबत नाहीतर तुमच्या विना.. असा सूर उमटत आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेसाठी २० मार्च ही अंतिम तारीख आहे. त्यापूर्वीच महायुती व महाविकास आघाडीला निर्णय घ्यावा लागणार आहे .सातारा जिल्ह्यामध्ये अकरा पंचायत समिती पैकी सातारा, कराड आणि खटाव मध्ये भाजप स्वबळावर निवडून येऊ शकते. तसाच प्रकार खंडाळा, कोरेगाव, वाई मध्ये राष्ट्रवादी आणि पाटणला शिवसेना स्वबळावर सत्ता स्थापन करू शकतात. हे सिद्ध झाले आहे. सातारा जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाकडे सत्तावीस व एक अपक्ष असे २८ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे २० शिवसेनेकडे १५, राष्ट्रीय काँग्रेसचे व स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रत्येकी १ असे पक्षीय बलाबल आहे. सदस्यांचे मत अजमावल्यानंतर भाजपला नमतेपणा घ्यावा लागला आहे. ही संधी साधून राष्ट्रवादी व शिवसेनेने आला तर तुमच्या सोबत अन्यथा तुमच्या विना असे स्पष्ट सांगून आपला राजकीय इरादा स्पष्ट केला आहे. त्यामुळे स्वबळाचा नारा देणाऱ्या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना राजकीय दृष्ट्या घरात जिल्हा परिषद महिला अध्यक्ष उमेदवार असूनही अध्यक्षपदापासून दूर जावे लागत आहे. हे सुद्धा स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष पद इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव असल्यामुळे या जागेवर प्रमुख दावेदार म्हणून पाटण, कोरेगाव व खटाव आणि कराड तालुक्यामधून इच्छुकांची मोर्चा बांधणी सुरू झालेली आहे.
मुंबईमध्ये महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन असल्यामुळे महायुती मधील प्रमुख घटक पक्षाने एकमेकांशी संवाद ठेवला असला तरी महायुती म्हणजे राष्ट्रवादी व शिवसेना, काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना असा त्यातून अर्थ निघत आहे. भाजपला महायुती म्हणून सहभागी व्हायचा असेल तर त्यांना सभापती पद मिळू शकते असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. दोन पंचायत समितीमध्ये पक्षीय बलाबल समान असल्यामुळे त्याचाही विचार करावा लागणार आहे असे दिसते.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button