वडूज:-मारहाण झाल्याने गोरेगाव निमसोड येथे एकाचा आत्महत्येचा प्रयत्न.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
मारहाण झाल्याने गोरेगाव निमसोड येथे एकाचा आत्महत्येचा प्रयत्न.
वडूज दि: गोरेगाव निमसोड ता खटाव जिल्हा सातारा येथील आनंदराव डोईफोडे यांना गावातील तीन इसमांनी बेदम मारहाण केली. त्यामुळे भीतीपोटी आनंदराव डोईफोडे यांनी कीटकनाशक औषध प्राशन केले. त्यांचे प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत माहिती अशी की, अंकुश बाबुराव डोईफोडे रा. गोरेगाव निमसोड यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सातारा यांना निवेदन देण्यासाठी आले आहेत. या निवेदनामध्ये आनंदराव बाबुराव डोईफोडे वय- ४० यांना माती घेऊन जाण्याच्या पैशाबाबत मारहाण करण्यात आली. सदर मारहाणीमुळे त्यांना खूप वेदना झाल्या असून ते भयभीत झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी कीटकनाशक औषध पिऊन आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे .
वडूज ग्रामीण रुग्णालयातून त्यांना अधिक उपचारासाठी काल क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालय, सातारा या ठिकाणी दाखल केले आहे. सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय उपचार घेत आहेत. या ठिकाणी वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी रुग्ण आनंद बाबुराव डोईफोडे वय ४० यांची प्रकृती चिंताजनक आहे. असे सांगितले आहे. तसेच त्यांची कागदपत्रांवर सही घेतली आहे.त्यामुळे त्यांच्या जीवितला जर बरे वाईट काय झाले तर याबाबत सर्व आरोपींच्या विरोधात भा.द.वि .कलम ३०२ चा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी निवेदनाद्वारे केलेली आहे.
कारण, यापूर्वी वडूज पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी गेले असता त्या ठिकाणच्या ठाणे अंमलदारांनी वेळेत तक्रार घेतली नाही. तसेच आरोपी सुशील कुमार दत्तू पाटील, ज्ञानेश्वर गोविंद पाटील व रमेश महाराज निमसोड कदमवाडी यांनी केलेल्या मारहाणी मुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूला तिन्ही व्यक्ती जिम्मेदारी अशा पद्धतीची चिठी लिहून आनंद बाबर डोईफोडे यांनी विष प्राशन केलेले आहे. याबाबत आमची लेखी तक्रार असून बंधू आनंद डोईफोडे लवकर बरे व्हावे असे आम्ही प्रार्थना करत आहे. तसेच सध्या आरोपीला अटक न केल्यास मी सुद्धा आत्मदहन करीन असे निवेदनात नमूद केले आहे .सदरची चिठ्ठी निवेदना सोबत जोडलेली आहे.
सध्या आनंदराव डोईफोडे हे उपचार घेत असून त्यांच्यासोबत त्यांचे बंधू अंकुश डोईफोडे हे रुग्णालयात थांबलेले आहे. रात्री ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांना उद्या बोलवण्यात आलेले आहे. दरम्यान, याबाबत आरोपींना तातडीने अटक व्हावी. अशी मागणी काही ग्रामस्थांनी केलेली आहे.
———————————————–
फोटो -मारहाणीला घाबरून आत्महत्या करणारे रुग्ण सातारा यथे उपचार घेताना…