श्रीरामपूर:-नगर येथे देण्यात येणाऱ्या भोजनासाठी उंदिरगाव येथील मराठा बांधवांकडुन 41 हजारांची मदत.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
नगर येथे देण्यात येणाऱ्या भोजनासाठी उंदिरगाव येथील मराठा बांधवांकडुन 41 हजारांची मदत.
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) मराठा आरक्षण आंदोलनासाठी मुंबईला जाणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या १ लाख सहकारी बांधवांना नगर येथे श्रीरामपूरकर जेवण देणार आहेत.
यासाठी तालुक्यात जोरात तयारी सुरू असून या कार्याला हातभार लावण्यासाठी उंदिरगाव येथे दि . १२ जानेवारी २०२४ ला श्री स्वामी समर्थ केंद्रात मराठा बांधवांची बैठक झाली त्यात ठरल्याप्रमाणे ७ दिवसात ज्याला जी रक्कम जमा करण्याचा निर्णय झाला. ठरल्याप्रमाणे ७ दिवसात ज्याला जी रक्कम देण्याची इच्छा असेल ती वर्गणी गोळा करण्यात आली सदर वर्गणी गोळा करण्यात बाळासाहेब घोडे, प्रकाश ताके . दिलीप भालदंड . सतीष नाईक . नवनाथ गायके,सुनील ताके, सुनील भालदंड यांनी मोलाची भूमिका बजावली . जमा झालेली सर्व रक्कम ४१ हजार रुपये व त्या रकमेचा हिशोब आज मराठा समाज ऑफिस श्रीरामपुर येथे पोहच करण्यात आला.