ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

महाबळेश्वर:-पाचगणीच्या विकासाला नवे नेतृत्व : दिलीप भाऊ बगाडे नगराध्यक्षपदी; पारदर्शक व लोकाभिमुख कारभाराचा संकल्प…

पत्रकार अनिल वाडकर सातारा जिल्हा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पाचगणीच्या विकासाला नवे नेतृत्व : दिलीप भाऊ बगाडे नगराध्यक्षपदी; पारदर्शक व लोकाभिमुख कारभाराचा संकल्प…

पाचगणी, : गिरीस्थान नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षपदी दिलीप भाऊ बगाडे यांनी आज विधिवतपणे पदभार स्वीकारला. यावेळी मुख्याधिकारी पंडित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी, पक्षाचे ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडलेल्या पदभार स्वीकार समारंभात उत्साहाचे वातावरण होते. पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे यांनी पाचगणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक, लोकाभिमुख आणि सर्वसमावेशक कारभार करण्याचा संकल्प व्यक्त केला.नव्या नेतृत्वाच्या या पहिल्याच अधिकृत कार्यक्रमातून एकजूट आणि शिस्तबद्ध कारभाराचा संदेश देणारा आला.
यावेळी ते म्हणाले,
“पाचगणी शहराच्या विकासासाठी सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन काम करणार आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, पर्यटन विकास तसेच मूलभूत नागरी सुविधा या विषयांना प्राधान्य देण्यात येईल.”
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनीही शहराच्या विकासासाठी सकारात्मक व सहकार्याची भूमिका निभावण्याचे आश्वासन दिले. पदभार स्वीकार समारंभानंतर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करत नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचे अभिनंदन केले.
यानंतर नवनिर्वाचित श्री घाटजाई शहर विकास आघाडीच्या १५ सदस्यांच्या सत्ताधारी बाॅडीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतषबाजी केली.त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करून सामाजिक बांधिलकीची भावना व्यक्त केली.

यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक तथा श्री घाटजाई शहर विकास आघाडीचे अध्यक्ष शेखर कासुर्डे, नरेंद्र बिरामने, महेश खांडके, प्रकाश गोळे, राजेंद्र पारठे,आकाश बगाडे, अमित कांबळे, नगरसेविका सौ.सुप्रिया माने,विमल भिलारे, राजश्री सणस, परवीन मेमन, स्वाती कांबळे, अमृता गोळे, माधुरी कासुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button