श्रीरामपूर:-माळेवाडी येथे जादूटोणाचा प्रकार.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
माळेवाडी येथे जादूटोणाचा प्रकार.
श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथे जादूटोणा करण्याचा प्रकार आज २७ जानेवारी रोजी उघडकीस आला माळेवाडी येथील बस स्टॅन्ड वर स्थित असलेले श्री संतोष उमाप यांच्या हॉटेल च्या दरवाजा समोर जा दुटोणा केलेल्या ठिकाणी कुंकवाचे गोल रिंगण त्यात चौफुली चार चौकोनात चार लिंबु टाचण्या लावलेले आणि मध्य भागी एक अंडे त्याला काळ्या रंगाचे डाग असल्याचे निदर्शनास आले असी माहिती सदर व्यवसायिक संतोष उमाप यांनी दिली असता गावामध्ये वार्ता वाऱ्यासारखी पसरली त्याचबरोबर नागरीकांनी ते दृश्य बघण्यासाठी एकच तोबा गर्दी केली खरच . ह्या आधुनिक वैज्ञानिक युगात असे प्रकार घडणे म्हणजे आजही बहुतांश जनता अंधश्रद्धा मानतात असे प्रकार घडल्यामुळे माळेवाडी परिसरातील व्यवसायीका मध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे त्याचा तपास पोलीस प्रशासन व अंधश्रद्धा निर्मूलन समिति यांनी लवकर करावा तसेच जो कोणी हा ढोंगी पाखंडी अंधश्रद्धा निर्माण करतो त्याच्यावर कडक कारवाई करावी असे संतोष उमाप यांनी यावेळी विनंती केली.