ताज्या घडामोडी

सातारा शहरातील नूतन पालकमंत्र्यांच्या स्वागताचे बॅनर २४ तासातच नाहीसे…

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

सातारा शहरातील नूतन पालकमंत्र्यांच्या स्वागताचे बॅनर २४ तासातच नाहीसे…


सातारा दि: महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खाण व माजी सैनिक कल्याण कॅबिनेट मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या स्वागताचे सातारा शहराच्या रस्त्यावर बॅनर लावण्यात आले होते. कोणतीही परवानगी न काढता लावलेले बॅनर सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने २४ तासातच नाहीसे केले आहे. डी.जे .चा आवाज येतो पण देवाच्या काठीचा आवाज येत नाही. अशी प्रतिक्रिया उमटली आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्हा पालकमंत्री पदी निवड झाल्यानंतर सर्वच प्रथम सातारा जिल्ह्यात आगमन झालेल्या नामदार शंभूराज देसाई यांचे शिरवळ पासून ते त्यांच्या निवासस्थानापर्यंत अनेकांनी त्यांचे स्वागत केले. पेढे तुला केला. सातारा शहरातील पोवई नाक्यावर मोठ्या आवाजात डी.जे. लावण्यात आल्याने पालकमंत्र्यांच्या कानठळ्या बसल्या होत्या. पण, कर्तव्यदक्ष व कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांनी त्याकडे कानाडोळा केला. याबाबत काही जागरूक प्रसार माध्यमाने प्रश्न उपस्थित केल्यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सारवासारव केली. स्वातंत्र्यदिनानिमित्त रस्त्याच्या दुभाजकामध्ये तिरंगी विद्युत रोषणाई साठी ठेकेदार नेमले होते. परंतु ,रस्त्यावरच्या दुभाजकाच्या ठिकाणी व रस्त्याच्या लगत पालकमंत्री शंभूराजेंच्या स्वागताचे व अभिनंदनचे बॅनर लावण्यात आले होते. कोणतीही पूर्व परवानगी न करता लावलेले बॅनर अखेर सातारा नगरपालिका अतिक्रमण विभागाने २४ तासाच्या आतच नाहीसे केले.
वास्तविक पाहता सातारा जिल्हा पालकमंत्री पदी शंभूराज देसाई यांची निवड झाल्यामुळे सातारा शहरातील नव्या जुन्या भाजपमधील एका गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सध्या सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून सातारा नगरपालिकेमध्ये सत्ता आहे. त्यामुळे नामदार शंभूराज देसाई यांचे बॅनर अतिक्रमण विभागाने काढण्याचे धाडस केल्याबद्दल अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. वास्तविक पाहता पूर्वपरवानगीशिवाय हे बॅनर लागलेच कसे? बॅनर लावताना अतिक्रमण विभाग डोळे झाकून होते का? यानिमित्त सर्वसामान्य जनता प्रश्न उपस्थित करत आहे. सातारा नगरपालिकेच्या कारभाराबाबत अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले पण त्यामध्ये सुधारणा झालेली नाही. याकडेही आंदोलकांनी लक्ष वेधून सातारा नगरपालिकेच्या कारभाराबाबत कभी खुशी कभी गम नक्कीच आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

फोटो– सातारा नगरपालिकेच्या रस्त्यावर विना परवाना लावलेले बॅनर हटवताना कर्मचारी (छाया- अजित जगताप ,सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button