पुणे निगडी:-सेक्टर 22 मधील मोकाट डुकरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यास धोका – सौ. माया ठोसर.
प्रतिनिधी शफीक शेख निगडी पुणे:-9767275783

राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
सेक्टर 22 मधील मोकाट डुकरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यास धोका – सौ. माया ठोसर.
निगडी, दि. 28 (शफिक शेख) – स्मार्ट सिटी आणि स्वच्छतेच्याबाबतीत प्रथम क्रमांकावर असल्याच्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अस्मितेला त्यांच्याच आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कामातील कुचराईमुळे सेक्टर नंबर 22 मध्ये प्रचंड प्रमाणात मोकाट डुकरे सर्वत्र घाण करीत आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सौ. माया ठोसर यांनी केले आहे.
याबातीत पुढे त्या म्हणाल्या की, या परिसरातील नागरिक जे बहुतांश दलित आणि मुस्लिम आहेत. कदाचित यामुळे आरोग्य विभागाचे या परिसराकडे दुर्लक्ष होत आहे. अनेकवेळा तक्रार देउनही आरोग्य विभागाचे कर्मचारी केवळ 2-3 डुकरे पकडून कारवाई केल्याचा कांगावा करतात. परंतु पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. या कारवाईतील कुचराईमागे आरोग्य विभागातील कर्मचा-यांचे ‘‘आर्थिक’’ हितसंबंध गुंतल्याची शंकाही यावेळी नागरिकांमधून व्यक्त केली जात. आहे.
येथे शासकीय रूग्णालय, शाळा, भाजीमार्केट, स्मशानभूमी, दफनभूमी असे भरपूर लोकवस्ती असलेला हा परिसर आहे. पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्री. शेखर सिंग यांनी सदर प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेवून यासंबंधित विभागांना आदेश देवून कारवाई करण्याचे आणि यासंबंधी ज्यांचे हितसंबंध गुंतले आहेत त्या अधिकारी आणि कर्मचारी यांचेवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंतीही यावेळी सौ. ठोसर यांनी केली.