वाई:- किसन वीर महाविद्यालयातील प्रा. डॉ. सुनील सावंत यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई दि.31
किसन वीर महाविद्यालयातील प्रा. डॉ. सुनील सावंत यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार.
वाई जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख, माजी उपप्राचार्य, महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय सदस्य, तसेच शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यापरिषद सदस्य प्रा. (डॉ.) सुनील सावंत यांचा सेवानिवृत्तीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांच्या हस्ते शाल, पुष्प गुच्छ, श्रीफळ व आंब्याचे रोप देऊन समारंभपूर्वक सेवागौरव करण्यात आला. तसेच सावंत सरांच्या सुविद्य पत्नी सौ. सुरेखा सावंत यांचा डॉ. मंजूषा इंगवले यांच्या हस्ते साडी, पुष्प गुच्छ, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रा. (डॉ.) सुनील सावंत यांनी २७ जून १९८८ पासून ३१ मार्च २०२५ अखेर एकूण ३७ वर्षे पदवी व पदव्युत्तर वर्गांना एकनिष्ठेने व प्रामाणिकपणे अध्यापन केल्याबद्दल मदनदादांनी त्यांचे अभिनंदन केले. मदनदादा भोसले म्हणाले, “निष्ठेने काम करणाऱ्या शिक्षकांच्यामुळे संस्था मोठी होते. सावंत सरांची संस्थेप्रती असणारी तळमळ वाखाणण्याजोगी आहे. एकनिष्ठपणे काम केल्यास संस्था नावलौकिक प्राप्त करू शकते.” मदनदादांनी त्यांना भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
प्र. प्राचार्य प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये सावंत सरांनी केलेल्या नॅकच्या कामाचा विशेष उल्लेख केला. त्यांनी प्रत्येक काम प्रामाणिकपणे केल्यामुळे ते निवृत्तीवेळी कृतार्थ असल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी, उपप्राचार्य प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे, डॉ. हणमंतराव कणसे व श्री. भिमराव पटकूरे, प्रा. डॉ. विनोद वीर, डॉ. बाळकृष्ण मागाडे, डॉ. सौ. मंजूषा इंगवले, डॉ. रवींद्र बकरे, श्री. विवेक सुपेकर, जितेंद्र चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करून सेवानिवृत्तीनंतरच्या उर्वरित आयुष्यासाठी डॉ. सावंत यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. वरिष्ठ महाविद्यालयातील विभाग प्रमुख व सहकारी प्राध्यापकांनी सावंत सरांचा यथोचित सन्मान केला.
कार्यक्रमास संस्थेचे खजिनदार प्रा. नारायण चौधरी, माजी प्रभारी प्राचार्य डॉ. एकनाथ भालेराव, श्री. गणेश चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्टाफ सेक्रेटरी डॉ. अंबादास सकट यांनी केले. आभार श्री. भिमराव पटकूरे यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन श्रीमती रेश्माबानो मुलाणी व सुमती कांबळे यांनी उत्तम पार पाडले. सावंत सरांच्या सेवानिवृत्ती शुभेच्छा समारंभास वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.